Women's Health : महिलांमधील हार्मोनल बिघाड झाल्याचं या 9 लक्षणांवरुन ओळखा, व्हा सावध
Women Health : महिलांच्या शरीरात वेगवेगळ्या टप्प्यावर बदल होत असतात. या सगळ्यात हार्मोनल बिघाड होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी शरीरातील 9 लक्षणांवरुन आपण हे बदल ओळखू शकतो.
8 मार्च रोजी जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त महिलांनी आपल्या शरीराबाबत जागरुक असणे हा संदेशही दिला जातो. यावरुन हार्मोनल बिघाड शरीरावर किती परिणाम करु शकतो, ते जाणून घेऊया.
जेव्हा शरीरात हार्मोन्सचे उत्पादन, स्राव किंवा क्रिया यांमध्ये अनियमितता असते तेव्हा हार्मोनल असंतुलन होते. विविध शारीरिक कार्यांमध्ये हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात आणि असंतुलनामुळे विविध प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. संप्रेरक चढउतार हा जीवनाचा एक सामान्य भाग असला तरी, स्त्रियांच्या शरीरात सतत हार्मोनलचे असमतोल चिंताजनक असू शकते