World Cup 2023 : 9 टीम 4 जागा, असं आहे प्रत्येक टीमसाठी सेमीफायनल पात्रतेचं गणित

World Cup 2023 : सध्या भारतात वर्ल्ड कपची धूम सर्वत्र पहायला मिळतेय. टॉप 4 साठी सर्व टीम्समध्ये चुरशीची लढत रंगते आहे. पण या 9 टीम्ससाठी सेमीफायनलला पोहोचण्यासाठी काय निकष आहेत ते आपण आज पाहणार आहोत.  

Nov 02, 2023, 15:54 PM IST
1/9

भारत

आणखी किमान एक सामना जिंकावा लागेल.  सर्व सामने गमावले तरीही 12 गुण मिळवू शकणार्‍या इतर चार संघांपैकी किमान एका संघापेक्षा चांगलला NRR असावा लागेल.   

2/9

साऊथ आफ्रिका

कमीत कमी  अजून एक सामना जिंकणे.  सर्व सामने गमावले तरीही 12 गुण मिळवू शकणार्‍या इतर चार संघांपैकी किमान एका संघापेक्षा चांगलला NRR असावा लागेल. 

3/9

ऑस्ट्रेलिया

उर्वरित तीनही सामने जिंकणे. दोन सामने जिंकणे  आणि 12 गुण मिळवू शकणार्‍या इतर चार संघांपैकी किमान एका संघापेक्षा उत्कृष्ट NRR असणे गरजेचे.  एक सामना जिंकणे आणि 10 पॉईंट्स मिळवू शकणाऱ्या कोणत्याही संघापेक्षा उत्कृष्ट NRR असणे.   

4/9

न्युझीलँड

दोन सामने जिंकणे  आणि 12 गुण मिळवू शकणार्‍या इतर चार संघांपैकी किमान एका संघापेक्षा उत्कृष्ट NRR मेंटेन करणे.  एक सामना जिंकणे  आणि 10 पॉईंट्स मिळवू शकणाऱ्या कोणत्याही संघापेक्षा उत्कृष्ट NRR असणे.   

5/9

पाकिस्तान

दोन्ही सामने जिंकणे  आणि 10 पॉईंट्स पूर्ण करू शकणाऱ्या कोणत्याही संघापेक्षा उत्कृष्ट NRR असणे  एक सामना जिंकला, तरीही  ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला त्यांचे सर्व सामने गमावण्याची गरज आहे; अफगाणिस्तानने  किमान 2 सामने गमावणे गरजेचे  आणि 8 पॉईंट्स मिळवू शकणाऱ्या कोणत्याही संघापेक्षा चांगल्या NRR असणे गरजेचे.   

6/9

अफगाणिस्तान

जास्तीत जास्त 12 गुणांसह पूर्ण करण्यासाठी किमान एक परंतु आदर्शपणे सर्व 3 सामने जिंकणे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि समान गुण मिळवणाऱ्या कोणत्याही संघाला मागे टाकण्यासाठी पुरेसा NRR असणे.   

7/9

श्रीलंका

जास्तीत जास्त 10 गुण मिळवण्यासाठी किमान दोन परंतु आदर्शपणे सर्व तीन सामने जिंकणे.  समान गुण पूर्ण असणाऱ्या कोणत्याही संघाला मागे टाकण्यासाठी पुरेसे NRR वाढवणे.  न्यूझीलंड आणि/किंवा ऑस्ट्रेलियाला किमान दोन सामने गमवावे लागतील.  

8/9

नेदरलँड

जास्तीत जास्त 10 गुण मिळवण्यासाठी  किमान दोन परंतु आदर्शपणे सर्व तीन सामने जिंकणे.  समान गुण  पूर्ण असणाऱ्या कोणत्याही संघाला मागे टाकण्यासाठी पुरेसे NRR वाढवणे.  

9/9

इंग्लंड

सर्व तीन सामने जिंकणे.  ज्या टीमसोबत समान पॉईंट्स असतील त्या टीमपेक्षा जास्त NRR असणे.  न्युझीलँड आणि/किंवा ऑस्ट्रेलियाने सर्व सामने गमावणे.  पाकिस्तान, अफगाणिस्तान ,श्रीलंका आणि नेदरलँड्सपैकी कोणत्याही एका टीमने  10 गुण मिळवणे.