90 च्या दशकातील 'तो' अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट, ज्यात अभिनेता नाही तर अभिनेत्री निघाली खलनायिका, प्रेक्षकांना भांबावून सोडलं

आता कुठे जाऊन चित्रपटांमध्ये अभिनेत्री खलनायिकेच्या भूमिकेत दिसते. मात्र, या आधी फक्त अभिनेते हे खलनायकाच्या भूमिकेत दिसायचे. पण 90 च्या दशकातही असा एक चित्रपट होता ज्यात अभिनेता नाही तर अभिनेत्री होती खलनायक... 90 च्या दशकातील हा सगळ्यात थ्रिलर चित्रपटांपैकी एक होता. चला तर जाणून घेऊनया हा चित्रपट कोणता आहे...

| Oct 27, 2024, 18:02 PM IST
1/7

90 च्या दशकामधील 'या' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आज देखील हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल. ज्यामध्ये खलनायक नाही तर खलनायिका होती. 

2/7

या चित्रपटाचं नाव आहे 'गुप्त: द हिडेन ट्रुथ'. याच चित्रपटातून बॉबी देओलनं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. या चित्रपटात काजोल ही खलनायिकेच्या भूमिकेत दिसली. 

3/7

 'गुप्त: द हिडेन ट्रुथ' हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 90 दशकातील गाजलेल्या थ्रिलर चित्ररपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजीव राय यांनी केलं होतं. 

4/7

या चित्रपटासाठी सगळ्यात आधी रवीना टंडनला बॉबी देओलसोबत कास्ट करण्यात येणार होतं. त्यांनी या चित्रपटासाठी पोस्टर देखील शूट केलं होतं. मात्र, काही कारणांमुळे या चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 

5/7

'गुप्त' च्या कास्टिंगविषयी बोलायचं झालं तर यात बॉबी देओलनं साहिल सिन्हा ही भूमिका साकारली होती तर काजोलनं ईशा दीवान ही भूमिका साकारली होती. काजोल या चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. 

6/7

या चित्रपटात मनीषा कोयराला, ओम पुरी, राज बब्बर, परेश रावल, अशोक सराफ, दिलपी ताहिल आणि रजा मुराद हे कलाकार दिसले. 

7/7

1997 मध्ये प्रदर्शि झालेल्या या चित्रपटाचं बजेट हे 9 कोटी असल्याचं म्हटलं जातं तर चित्रपटानं 33 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केल्याचं म्हटलं जातं.