PHOTO : 99.9% लोकांना माहित नाही व्हिस्कीमध्ये किती पाणी मिसळावं; चव वाढविण्यासाठी योग्य प्रमाण काय?
देशात काय जगभरात मोठ्या प्रमाणात व्हिस्की लव्हर आहेत. पण अल्कोहलचं सेवन करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी सवय आहे. त्याशिवाय प्रत्येक अल्कोहल हे सेवन करण्याचा एक पद्धत असते. व्हिस्की कोणी ऑन द रॉक्स तर कोणी पाणी किंवा सोड्या सोबत घेतात. पण 99.90 टक्के लोकांना व्हिस्कीमध्ये किती पाणी मिक्स केल्यास खास चव मिळते हे माहिती नाही.
1/7
2/7
3/7
तज्ज्ञांच्या मतं, व्हिस्कीची मूळ चव टिकवून ठेवण्यासाठी नेमकं किती पाणी घालावे याबद्दल मद्यप्रेमींना माहिती नसतं. त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी एक संशोधन करण्यात आलं. 2023 मध्ये वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी आणि ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे अन्न शास्त्रज्ञ यांनी हा अभ्यास केला. टीमने व्हिस्की आणि पाण्याचा वेगवेगळ्या प्रमाणात अभ्यास करण्यात आला.
4/7
फूड्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असं म्हटलंय की, टीमने बोर्बन, राई, सिंगल-माल्ट, मिश्रित स्कॉच आणि आयरिश व्हिस्कीसह 25 वेगवेगळ्या व्हिस्कीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासासाठी अत्यंत अनुभवी व्हिस्की चाखणाऱ्यांच्या पॅनेलने परीक्षण केलं. शास्त्रज्ञांनी 100 टक्के व्हिस्की, 90 टक्के व्हिस्कीत 10 टक्के पाण्यात, 80 टक्के व्हिस्की 20 टक्के पाण्यात, 70 टक्के व्हिस्की 30 टक्के पाण्यात, 60 टक्के व्हिस्की 40 टक्के पाण्यात आणि 50 टक्के व्हिस्की 50 टक्के पाण्यात मिसळून चाचणी करण्यात आली.
5/7
या अभ्यासातून असं समोर आलं की, 80 टक्के व्हिस्की 20 टक्के पाण्यात मिसळल्यास उत्तम चव निर्माण होते. तसंच व्हिस्कीची ऑरिजनल चवही बदलत नाहीत. या अभ्यासातून ही सर्वोत्तम मिश्रण असल्याचं मान्य करण्यात आलं. ते म्हणाले की, नॉन-हायड्रोफिलिक रेणू जे पाण्यात चांगले मिसळत नाहीत ते काढून टाकले जातात त्यामुळे संतुलित चव मिळते.
6/7