अबब! नदीत सापडला एक, दोन नव्हे तर तब्बल 18 किलोचा महाकाय मासा, मच्छिमारही चक्रावले

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बांगलादेशात मच्छिमारांना (Fishermen Caught Giant Katla Fish) पदमा नदीत एक महाकाय कातला मासा सापडल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसला.या माशाचं वजन जास्तीत जास्त 2 ते 2.5 किलोपर्यंत असतं. पण बांगलादेशात जो मासा सापडला आहे त्याचं वजन तब्बल 18 किलो आहे.   

Feb 21, 2023, 17:18 PM IST
1/5

मासा किंवा मच्छी म्हटलं तर आपल्या डोळ्यासंमोर त्याचा एक सर्वसामान्य आकार दिसतो. पण बांगलादेशात मच्छिमारांच्या जाळ्यात एक असा मासा अडकला ज्याचं वजन आणि आकार इतका होता की सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.   

2/5

न्यूज18 बंगालीच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पदमा नदीतील एक मोठा कातला मासा जाळ्यात अडकल्यानंतर मच्छिमारांना आश्चर्याचा धक्काच बसला. ही मासा किमान दोन ते अडीच किलोंचा असतो. पण बांगलादेशात जो मासा सापडला आहे, तो 18 किलोंचा (18 kg Katla fish Bangladesh) आहे. याआधी बांगलादेशात इतका मोठा सापडला नसल्याचा लोकांचा दावा आहे.   

3/5

राजबरी येथील गोलांदा येथून हा मासा पकडण्यात आल्याची माहिती मिळाली. गुरुदेव हल्दर नावाच्या मच्छिमाराने हा मासा पकडला.   

4/5

मोहम्मद चंदू मोल्लाह यांनी हा मासा खरेदी केला आहे. ते स्थानिक व्यापारी असून नेमक्या किती किंमतीत हा मासा खरेदी केला हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. मात्र माशाचा आकार पाहता यासाठी बरीच मोठी किंमत मोजावी लागली असेल असा अंदाज आहे.   

5/5

मच्छिमारांचं म्हणणं आहे की, गर्मी वाढत असून पाऊसदेखील पडत नाही आहे. यामुळे पाण्याची पातळी खाली जात असल्याने रुई, कातला, बोआल असे मोठे मासे जाळ्यात अडकत आहेत.