पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 'या' खेळाडूने अचानक घेतली माघार

India vs South Africa Test Series : टीम इंडिया 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची टेस्ट सिरीज (IND vs SA) खेळणार आहे. या सिरीजतील पहिला टेस्ट सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

| Dec 23, 2023, 10:33 AM IST
1/7

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी युवा विकेटकीपर इशान किशनने माघार घेतल्याचे अपडेट मिळाले होते. 

2/7

मानसिक थकव्यामुळे ईशानने हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. 

3/7

२५ वर्षीय इशान किशनने मानसिक थकव्यामुळे दक्षिण आफ्रिका कसोटी सिरीजमधूनन माघार घेतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

4/7

गेल्या 12 महिन्यांपासून तो टीमसोबत नियमितपणे खेळत होता आहे.

5/7

इशान किशनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विनंती केली होती. 

6/7

दरम्यान यावेळी बीसीसीआयने किशनच्या विनंतीचे कारण सांगितलं नाही. इशानने वैयक्तिक कारण सांगून नाव मागे घेतल्याचं बोर्डाने म्हटलंय.

7/7

एका रिपोर्टनुसार, इशान किशनने टीम मॅनेजमेंटला मानसिक थकवा जाणवत असल्याची माहिती देत क्रिकेटमधून ब्रेक घेण्याची विनंती केली.