ब्रेकअपनंतरही मैत्रीच्या बंधनात अडकलेले सेलिब्रिटी

Apr 11, 2020, 10:27 AM IST
1/6

सलमान खान- कतरिना कैफ

सलमान खान- कतरिना कैफ

अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या आयुष्यात अभिनेत्री कतरिना कैफची एन्ट्री झाली. या दोघांच्या नात्याच्या चर्चा देखील फार रंगल्या. एवढचं  नाही तर चर्चा लग्नापर्यंत येवून पोहोचल्या होत्या. शिवाय कतरिनाला बॉलिवूडचा मार्ग दाखवणारा देखील सलमानच होता. पण त्यानंतर कतरिनाच्या आयुष्यात अभिनेता रणबीर कपूरची एन्ट्री झाली. पण सलमान खान- कतरिना कैफ यांचं मैत्रीचं नातं आजही तसचं आहे.

2/6

रणबीर कपूर-दीपिका पादुकोण

रणबीर कपूर-दीपिका पादुकोण

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त रणबीर आणि दीपिकाच्या नात्याच्या चर्चा होत्या. पण कालांतराने त्याच्यातील हे प्रेमाचे नाते संपले. दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केले आहे. तर  रणबीर आणि आलिया भट्टच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तरी देखील काही वेळा दीपिका आणि रणबीर अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात.

3/6

आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा

आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा

'स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी  पडद्यावर आलेले हे कलाकार आज प्रसिद्ध कलाकारांच्या यादीत आहेत. पण आता हे एक नसले तरी एकमेकांचे आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा चांगले मित्र आहेत. 

4/6

अनुष्का शर्मा - रणवीर सिंह

अनुष्का शर्मा - रणवीर सिंह

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त अनुष्का शर्मा - रणवीर सिंह यांच्या नात्याच्या चर्चा होत्या. 

5/6

करीना कपूर - शाहिद कपूर

करीना कपूर - शाहिद कपूर

अभिनेता सैफ अली खान सोबत लग्न करण्याआधी अभिनेता शाहिद कपूरसह करिनाच्या नावाची चर्चा होती. पण आता ते दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. 

6/6

ऋतिक रोशन - सुझैन खान

ऋतिक रोशन - सुझैन खान

ऋतिक रोशन - सुझैन खान यांचं घटस्पोट झालं असलं तरी ते अनेक वेळा त्यांच्या दोन मुलांसोबत वेळ घालवताना दिसतात.