अमिताभ बच्चन यांना 'विषारी खीर' देणारा चिमुरडा 25 वर्षांनी कसा दिसतो? ओळखणंही कठीण

अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणाऱअया सूर्यवंशम चित्रपटाला 25 वर्षं पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील चिमुरडा अभिनेता तुमच्या लक्षात आहे का?  

| Jun 11, 2024, 21:48 PM IST

अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणाऱअया सूर्यवंशम चित्रपटाला 25 वर्षं पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील चिमुरडा अभिनेता तुमच्या लक्षात आहे का?

 

1/10

अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या सूर्यवंशम चित्रपटाला 25 वर्षं पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील चिमुरडा अभिनेता तुमच्या लक्षात आहे का?  

2/10

तोच बाल अभिनेता ज्याने चित्रपटात अमिताभ बच्चन यांचं पात्र भानूप्रताप ठाकूरला विषारी खीर दिली होती. आनंद वर्धन याने सोनू हे पात्र साकारलं होतं.   

3/10

25 वर्षानंतर आता आनंद वर्धनला ओळखणंही कठीण झालं आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपलं करिअर आणि सूर्यवंशम चित्रपटात काम कऱण्याचा अनुभव याबद्दल सांगितलं आहे.   

4/10

आनंद वर्धन याने ओरिजनिल चित्रपट सूर्यवंशममध्येही काम केलं होतं. हिंदीत रिमेक करताना दुसऱ्या मुलाला घेणार होते. पण निर्मात्यांनी सूर्यवंशम पाहिल्यानंतर आनंदलाच घेण्याचा निर्णय घेतला.   

5/10

आनंद सांगतो की, अमिताभ यांनी त्याला हिंदी सुधारण्यात फार मदत केली. ते त्याचे शॉर्ट्स निरखून पाहायचे आणि त्यातील काही त्रुटी असल्या तर दाखवून द्यायचे.   

6/10

आनंद म्हणतो, आजही लोक अमिताभ बच्चन आणि माझा खीर देतानाचा फोटो शेअर करत या मुलाला खीर भरवा म्हणतात. हे फार मजेशीर आहे. लोकांना आजही ते लक्षात आहे याचा आनंद आहे.   

7/10

जर मला बॉलिवूडमध्ये काम करायचं असेल तर मी सांगेन की, मी तोच मुलगा आहे ज्याने विषारी खीर दिील होती. मला निर्माते लगेच ओळखतील यात दुमत नाही.   

8/10

आनंद आता अमिताभ यांच्या संपर्कात नाही. पण आपली त्यांना भेटायची इच्छा असून त्यांनी खीर नक्की देईन, पण त्यात विष नसेल असं हसत सांगतो.   

9/10

अमिताभ मला टायगर म्हणून हाक मारायचे असं आनंद सांगतो. 'ते म्हणायचे टायगर इथे ये. मला आता जाणीव होते की, मी लहानपणी अमिताभ यांच्यासह काम करुन किती मिळवलं आहे'  

10/10

आनंद दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत Nidurinchu Jahapana मधून कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. हा एक तेलुगू चित्रपट आहे.