काय म्हणावं याला! जोडप्याने चिखलात लोळत केलं प्री-वेडिंग फोटोशूट, अंगावर कपडे नसल्यासारखे...

Pre Wedding Photos: सोशल मीडियावर (Social Media) एका जोडप्याच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे (Pre Wedding Photoshoot) फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. याचं कारण म्हणजे या जोडप्याने चक्क चिखलात (Mud) लोळत फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटवर नेटकरी भन्नाट कमेंट्स करत आहेत.   

Mar 22, 2023, 21:00 PM IST
1/6

Pre Wedding Photos: सोशल मीडियावर (Social Media) एका जोडप्याच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे (Pre Wedding Photoshoot) फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. याचं कारण म्हणजे या जोडप्याने चक्क चिखलात (Mud) लोळत फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटवर नेटकरी भन्नाट कमेंट्स करत आहेत.   

2/6

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नाच्या या आठवणी वेगवेगळ्या प्रकारे कॅमेऱ्यात कैद करण्याचा जोडप्याचा प्रयत्न असतो. त्यातही सध्या प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड असून यासाठी वेगवेगळ्या कल्पना असतात. मात्र एका दांपत्याने असं काही प्री-वेडिंग फोटोशूट केलं आहे की त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.   

3/6

एका जोडप्याने केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी फोटोशूट करण्यासाठी एक अनोखी आणि भलतीच आयडिया वापरली आहे.   

4/6

जोडपं प्री-वेडिंग फोटोशूटसाठी चक्क चिखलात उतरलं आहे. दोघांच्या अंगावर फार मोजके कपडे असल्याचं या फोटोत दिसत आहे.   

5/6

काही रिपोर्टनुसार, हे जोडपं फिलिपाइन्समधील आहे. त्यांचं फार आधीच लग्न झालं असून हे जुने फोटो आहेत. मात्र हे फोटो सध्या नव्याने व्हायरल होत आहेत.   

6/6

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन वर्षं जुने फोटो आहेत. मात्र सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून चांगलीच चर्चा रंगली आहे.