सावधान! इन्कम टॅक्स रिटर्न्स भरल्यानंतर येतोय फेक मेसेज; चुकूनही रिप्लाय करु नका

 इन्कम टॅक्स रिटर्न्स भरल्यानंतर एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. याद्वारे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. 

Aug 08, 2023, 21:43 PM IST

File Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची 31 जुलै ही डेडलाईन संपली आहे. टॅक्स भरला असेल तर काहीच चिंता नाही. मात्र, तो भरल्यावर जर तुम्हाला एक मेसेज आला असेल तर मात्र चिंता करण्याची गरज आहे. कारण आलेला मेसेज तुम्ही नीट वाचला नाहीत आणि त्यावर क्लिक केली तर तुमचं बँक अकाऊंटही रिकामं होऊ शकतं.

1/10

फेक मेसेज पाठवून अनेकांना जाळ्यात अडकवून आर्थिक फसवणूक केली जात आहे.  सध्या एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. 

2/10

टॅक्स संदर्भात कुठलीही माहिती जाणून घ्यायची असेल तर इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे तुमच्या सर्व शंकांचं निरसन होईल. मात्र अशा फॉरवर्डेड मेसेवर विश्वास ठेऊन कुठेही लॉग ईन करू नका असं PIB फॅक्ट चेकने म्हटलंय.

3/10

 असा मेसेज येताच सावध व्हा. असे मेसेज कोणालाही फॉरवर्ड करू नका.

4/10

या मेसेजच्या माध्यमातून तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

5/10

स्वत: प्रेस इन्फर्मेशन ब्युरो अर्थातच पीआयबीनेही यावर शिक्कामोर्तब केल आहे. 

6/10

इन्कम टॅक्स विभागाकडून असा कोणताही मेसेज इन्कम टॅक्स रिटर्न भरणा-यांना पाठवलेला नाही.

7/10

या वेबसाईटवरुन संबंधित युझर्सची पर्सनल माहिती चोरली जाते. तेव्हा हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. 

8/10

या लिंकवर क्लिक केल्यास इन्कम टॅक्सच्या वेबसाईट प्रमाणेच दिसणाऱ्या खोट्या वेबसाईटवर युझर्सला रिडायरेक्ट केलं जातं.

9/10

तुम्ही तुमचा खाते क्रमांक XXXXXX व्हेरिफाय करुन घ्या. हा क्रमांक अयोग्य असेल तर तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती खालील लिंकवर अपडेट करु शकता,' असं या खोट्या मेसेजमध्ये सांगितलं जातं.

10/10

तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न म्हणून 15490 रुपये मिळणार आहेत. हे तुमच्या खात्यावर थोड्याच वेळात जमा केले जातील.