नाद करायचा नाय! लेक पायलट झाला, बापाने थेट हेलिकॉप्टरने हनुमान मंदिरावर केली पुष्पवृष्टी

सातारा (Satara) जिल्ह्यात मुलगा कर्मशियल पायलट (Commercial Pilot) झाल्यानंतर वडिलांनी थेट हेलिकॉप्टरमधून ग्रामदैवत हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी केली. चिराग डोईफोडे (Chirag Doiphode) याच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याला दुसरा कर्मशिअल पायलट मिळाला आहे.  

Apr 08, 2023, 20:49 PM IST
1/7

साताऱ्यातील पळशी गावातील चिराग डोईफोडे हा तरुण पायलट झाला आहे, त्याच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याला दुसरा कर्मशिअल पायलट मिळाला आहे.   

2/7

मुलगा पायलट झाल्यानंतर चिराग डोईफोडेच्या वडिलांनी थेट हेलिकॉप्टरमधून ग्रामदैवत हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी करत आपला आनंद साजरा केला.   

3/7

मुलगा पायलट झाल्याने शशिकांत डोईफोडे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुलगा हेलिकॉप्टरमधून उतरताच त्याला मिठी मारली तेव्हा त्यांना अश्रू अनावर होत होते.  

4/7

चिराग डोईफोडे 23 वर्षांचा असून त्याचे वडील चित्रपट निर्माते आहेत. देवमाणूस  मालिकेत त्यांनी कामही केलं आहे.   

5/7

चिरागने पहिली ते चौथीचं शिक्षण जिल्हा परिषदेत घेतलं असून, नंतरचं शिक्षण बारामतीत पूर्ण केलं. लहानपणासून त्याला पायलट होण्याची इच्छा होती.   

6/7

बारावी पास झाल्यानंतर त्याने डीजीसीए अंतर्गत विविध परीक्षा दिल्या. यानंतर दीड ते दोन वर्षांमध्येच त्याने परीक्षा उत्तीर्ण केल्या.   

7/7

मुलगा पायलट झाल्यास हनुमानाला मंदिरावर पुष्पवृष्टी करेन असा नवस बोललो होतो असं शशिकांत डोईफोडे यांनी सांगितलं.