लस घेतल्यानंतर अंगाला चिकटली भांडी, नाशिकमधल्या व्यक्तीचा दावा. पाहा फोटो

 कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccination) घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Jun 10, 2021, 15:31 PM IST

सध्या एक अतीशय एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये नाशिकच्या एका ज्येष्ठ नागरिकांच्या शरीराला धातू चिकटातायत. कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccination) घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्याचा प्रकार उघड झाला आहे

 

1/5

ही लस आहे की चुंबक?

ही लस आहे की चुंबक?

71 वर्षीय अरविंद जगन्नाथ सोनार यांना हा अनुभव येतोय. कुठल्याही धातूच्या वस्तू थेट शरीरावर चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यावर झी 24 तासने तातडीने याचा मागोवा घेत यात फसवेगिरी नाही ना याचा शोध घेतला  

2/5

लस आहे की चुंबक?

ही लस आहे की चुंबक?

'झी २४ तास' च्या कॅमेरासमोर सोनार यांनी वस्तू स्वतःच्या अंगाला चिकटवून दाखवल्या. दोन दिवसांपूर्वी कोरोना लसीचा दुसरा डोस त्यांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला होता. लस घेतल्यावर चुंबकत्व निर्माण होते या बातम्या समाज माध्यमात फिरत असल्याने त्यांनी स्वतःवर हा प्रयत्न करुन बघितला.

3/5

ही लस आहे की चुंबक?

ही लस आहे की चुंबक?

दुसरीकडे कोव्हिशिल्ड लस घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीरारात चुंबकत्व निर्माण झाल्याने अंधश्रद्धा समितीने तातडीने पाहणी केली. अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी याबाबत कुठलीही अंधश्रद्धा नसल्याचे स्पष्ट केले आहे. कुठलेही गैरसमज न ठेवता यामागील वैज्ञानिक कारण शोधावे, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

4/5

ही लस आहे की चुंबक? एक, दोन नाही तर अनेक वस्तु चिकटल्याचा दावा, पाहा फोटो

ही लस आहे की चुंबक? एक, दोन नाही तर अनेक वस्तु चिकटल्याचा दावा, पाहा फोटो

त्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. टोपे म्हणाले, यामागे नक्की काय आहे? यामागचे मेडिकल कारण काय आहे? हे तपासू आणि त्यावर योग्य तो निर्णय घेऊ.

5/5

ही लस आहे की चुंबक? एक, दोन नाही तर अनेक वस्तु चिकटल्याचा दावा, पाहा फोटो

ही लस आहे की चुंबक? एक, दोन नाही तर अनेक वस्तु चिकटल्याचा दावा, पाहा फोटो

आता अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या घरी आरोग्य विभाग पोहचले आहे. त्यांची तपासणी केल्यानंतर सत्यता काय आहे, हे लवकरच समोर येईल