62 हजार पुस्तकं रचून साकारली मंदिराची प्रतिकृती; डोंबिवलीच्या कलाकाराची किमया

संपूर्ण देशात 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या मार मंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह पहायला मिळत आहे.

Jan 19, 2024, 00:01 AM IST

Ayodhya Ram mandir : डोंबिवली येथे 62 हजार पुस्तकं रचून उभारलेल्या राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर येथे भेट देणार आहेत.  ही प्रतिकृती पूर्णपणे बनून तयार झाली असून आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. 

1/7

डोंबिवलीत 62 हजार 500 पुस्तकांच्या माध्यमातून आयोध्येमधील राम मंदिर प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

2/7

22 जानेवारी रोजी अयोध्येतील नव्या राम मंदिरात राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

3/7

19 जानेवारीपासून पुढले 10 दिवस नागरिकांना पाहता येणार आहे.

4/7

50 फूट उंच आणि 80 फूट रूंद राम मंदिराची ही प्रतिकृती आहे.

5/7

या प्रतिकृतीसाठी 62 हजार 500 मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा वापर यासाठी करण्यात आलाय.   

6/7

.श्रीकांत शिंदे फाउंडेशन, कल्याण डोंबिवली महापालिका आणि डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

7/7

सिद्धेश बागवे या कलाकाराने हे पुस्तकरूपी राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.