मातृप्रेम असावं तर असं! आईच्या आठवणीत मुलाने बांधला 'ताजमहाल'; खर्च केले तब्बल इतके कोटी रुपये

मुघल प्रशासक शाहजहाँने आपली पत्नी मुमताजच्या आठवणीत प्रेमातं प्रतिक म्हणून ताजमहाल बांधला. दरम्यान, आता एका मुलाने आपल्या आईच्या आठवणीत करोडो रुपये खर्च करत ताजमहालची प्रतिकृती उभी केली आहे.   

Jun 11, 2023, 19:29 PM IST
1/8

Son, Taj Mahal, Tamilnadu,

मुघल प्रशासक शाहजहाँने आपली पत्नी मुमताजच्या आठवणीत प्रेमातं प्रतिक म्हणून ताजमहाल बांधला. दरम्यान, आता एका मुलाने आपल्या आईच्या आठवणीत करोडो रुपये खर्च करत ताजमहालची प्रतिकृती उभी केली आहे.   

2/8

Son, Taj Mahal, Tamilnadu,

तामिळनाडूच्या तिरुवरुर जिल्ह्यातील अमरुदीन शेख दाऊद नावाच्या तरुणाने ताजमहालची प्रतिकृती उभारली आहे.   

3/8

Son, Taj Mahal, Tamilnadu,

अमरुदीनची आई जेलानी बीवी यांचं 2020 मध्ये आजारामुळे निधन झालं होतं. आई आपलं सर्वस्व असल्याने तिच्या जाण्याने अमरुदीनला फार मोठा धक्का बसला होता.   

4/8

Son, Taj Mahal, Tamilnadu,

अमरुदीन सांगतो की, आपली आई शक्ती आणि प्रेमाचं प्रतीक होती. 1989 मध्ये पतीचं रस्ते अपघातात निधन झाल्यानंतर पाचही मुलांचा सांभाळ करणं त्यांच्यासाठी कठीण होतं. ज्यावेळी अमरुदीनच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा त्याच्या आईचं वय फक्त 30 वर्षं होतं.   

5/8

Son, Taj Mahal, Tamilnadu,

"आमच्या समाजात प्रथा असतानाही आईने वडिलांच्या निधनानंतर पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मी आणि माझी बहिण त्यावेळी फार लहान होतो. माझ्या आईने कुटुंबाच्या सुरक्षेसाठी फार संघर्ष केला. ती आमचा कणा होती. तिने आमच्यासाठी वडिलांची भूमिका निभावली," असं अमरुदीन सांगतो.   

6/8

Son, Taj Mahal, Tamilnadu,

2020 मध्ये आईचं निधन झाल्यानंतर माझा विश्वासच बसत नव्हता. ती अजूनही आमच्यासोबत असून, तिला राहायचं आहे असं वाटत होतं. आमची तिरुवरुर येथे जमीन असून कुटुंबीयांना आईला दफनभूमीत दफन करण्याऐवजी आपल्या जमिनीत दफन करण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं. मी स्मारक बनवण्याची इच्छा व्यक्त केली असता कुटुंबाने ती मान्य केली असं अमरुदीने सांगितलं.   

7/8

Son, Taj Mahal, Tamilnadu,

स्मारक बनवण्यासाठी अमरुदीनने ड्रीम बिल्डर्सशी संपर्क साधला. सुरुवातीला त्याला ताजमहालची प्रतिकृती बनवण्याचा सल्ला अमान्य केला होता. पण आई आपल्यासाठी एक आश्चर्य होती सांगत तो यासाठी तयार झाला.   

8/8

A son builds Taj Mahal in memory of mother in Tamilnadu

Son, Taj Mahal, Tamilnadu,

ताजमहालची प्रतिकृती उभी करण्यासाठी तब्बल दोन वर्षं बांधकाम सुरु होतं. यासाठी तब्बल 5 ते 6 कोटी रुपये खर्च केले. हे पैसे त्यांच्या आईनेच ठेवले होते. ही जमीन आणि इमारत एका स्वयंसेवी संस्थेला देण्यात आली आहे.