'तारक मेहता'च्या अब्दुलने सांगितले अचानक गायब होण्याचे कारण

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील अब्दुलने मालिका सोडण्याच्या बातमीवर आपले मौन सोडले आहे. काय म्हणाला अब्दुल? वाचा सविस्तर 

| Aug 23, 2024, 15:37 PM IST
1/6

शरद सांकला

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालिकेत अब्दुलची भूमिका साकारणाऱ्या शरद सांकला यांनी शो सोडल्याची चर्चो सुरु होती. 

2/6

मौन सोडले

16 वर्षांपासून अब्दुल या मालिकेत आहे. आता त्याने व्हायरल होणाऱ्या अफवांवर मौन सोडले आहे. तो म्हणाला की, मालिका सोडण्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. मी अजूनही मालिकेचा एक भाग आहे आणि नेहमीच असेल.

3/6

अब्दुल अजूनही मालिकेत

मीडिया रिपोर्टनुसार, शरद म्हणाला ही बातमी खरी नाही. मी कुठेही जात नाही. मी अजूनही या शोचा एक भाग आहे. 

4/6

लवकरच परत येईल

सध्या शोचे कथानक असे आहे की माझे पात्र त्यामध्ये दिसत नाही. पण अब्दुल लवकरच परत येईल. 

5/6

दीर्घकाळ चालणारी मालिका

हा कथानकाचा भाग आहे. हा एक सुंदर आणि दीर्घकाळ चालणारी मालिका आहे. अब्दुलच्या व्यक्तिरेखेने मला मोठी ओळख दिली आहे. 

6/6

चित्रपटांमध्ये काम

ही मालिका सोडण्याचा मी कधीही विचारही करु शकत नाही. त्याचबरोबर शरदने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.