सुशांतची कथित प्रेयसी कूपर रुग्णालयात; थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने Sushanth Singh Rajput रविवारी वाद्र्यांतील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  

Jun 15, 2020, 18:34 PM IST

सुशांतने इतकं टोकाचं पाऊल नैराश्यातून उचललं असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.

1/5

मुंबईतील कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं.

2/5

सुशांतची तथाकथित प्रेयसी रिया चक्रवर्ती कूपर रुग्णालयात दाखल झाली. रियाला तिच्या कुटुंबातील सदस्यांसह रुग्णालयाबाहेर पाहण्यात आलं.

3/5

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस रियाचंही स्टेटमेंट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.  

4/5

सुशांत आणि रिया या दोघांना बर्‍याचदा मुंबईत एकत्र फिरताना पाहण्यात आलं होतं. 

5/5

सुशांतचे वडील आणि काही कुटुंबियही पटणाहून मुंबईत दाखल झाले आहेत. सुशांतच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (फोटो सौजन्य : ANI)