22 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू

May 27, 2020, 19:06 PM IST
1/5

अभिनेत्रीच्या कारला अपघात

अभिनेत्रीच्या कारला अपघात

प्रख्यात कन्नड टीव्ही अभिनेत्री मेबियाना मायकेल यांचे मंगळवारी संध्याकाळी एका अपघातात निधन झाले. अभिनेत्री मेबियाना फक्त 22 वर्षांची होती. 

2/5

इंडस्ट्रीवर शोककळा

इंडस्ट्रीवर शोककळा

मेबियाना मायकेलच्या या अपघाती निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

3/5

गावी जात असताना निधन

गावी जात असताना निधन

मंगळवारी संध्याकाळी मेबियाना मायकेलची कार ट्रॅक्टरला ठोकल्य़ामुळे हा अपघात झाला. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या गावी जात होती, पण रस्त्यातच तिच्या कारला अपघात झाला. मेबियाना सोबत असलेले तिच्या काही मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण मेबियानाचा मात्र या अपघातात मृत्यू झाला आहे. इतक्या लहान वयात तिचं जाणं अनेकांना चटका लावणारं आहे.

4/5

अनेकांना धक्का

अनेकांना धक्का

Pyaate Hudugir Halli Life कार्यक्रमाचे होस्ट अकुल बालाजी यांना देखील या बातमीने धक्का बसला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, 'माझी फेवरेट कंटेस्टेंट आणि Pyaate Hudugir Halli Life सीजन 4 च्या विनरचं असं निघून जाणं धक्कादायक आहे. मला विश्वास होत नाहीये की ती आपल्यात नाही. तिच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.'

5/5

लोकप्रिय शोची विनर

लोकप्रिय शोची विनर

मेबियाना मायकेल हिने लोकप्रिय शो Pyaate Hudugir Halli Life मधून प्रसिद्धी मिळवली होती.