महाराष्ट्रातील एकमेव धबधबा जो वर्षाचे 12 महिने कोसळतो; कोकणातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ आणि जागृत देवस्थान

पावसाळा आली सर्वांनाच धबधबे आकर्षित करतात. बहुतांश धबधबे हे पावसाळ्यात प्रावाहित होतात.  मात्र, महाराष्ट्रात एक असा धबधबा आहे जो वर्षाचे 12 महिने प्रवाहित असतो. हा धबधबा कोकणात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या  मार्लेश्वराच्या मंदिराशेजारी हा धबधबा आहे.  धारेश्वर नावाचा हा बारमाही वाहणारा नयनरम्य धबधबा आहे.

| May 09, 2024, 20:05 PM IST

Marleshwar Waterfall : पावसाळा आली सर्वांनाच धबधबे आकर्षित करतात. बहुतांश धबधबे हे पावसाळ्यात प्रावाहित होतात.  मात्र, महाराष्ट्रात एक असा धबधबा आहे जो वर्षाचे 12 महिने प्रवाहित असतो. हा धबधबा कोकणात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या  मार्लेश्वराच्या मंदिराशेजारी हा धबधबा आहे.  धारेश्वर नावाचा हा बारमाही वाहणारा नयनरम्य धबधबा आहे.

1/7

मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागृत देवस्थान आहे. येथेच हा अनोखा धबधबा आहे.  

2/7

धबधब्यासमोर एक खोल डोह आहे ज्याच्या खोलाची अद्यापही अंदाज आलेला नाही.

3/7

परिसरातील वनराई व शांतता या सुंदर धबधब्याच्या सुंदरतेत आणखी भर घालते.

4/7

वर्षाचे बारा महिने हा धबधबा कोसळत असतो. यामुळे कोणत्याही ऋतुमध्ये येथे भेट देता येवू शकते. 

5/7

सह्याद्रीच्या दगडातून हा फेसाळणारा धबधबा त्याच्याच नादात अगदी बेभान होऊन कोसळत असतो.

6/7

 मार्लेश्वराच्या मंदिराशेजारी धारेश्वर नावाचा धबधबा आहे. मार्लेशवर हे कोकणातील जागृत देवस्थान आहे. 

7/7

सह्याद्रीच्या कातळातून सहस्त्र धारांनी फेसाळून वाहणारा धबधबा आपल्या नादमधुर ध्वनीने पर्यटकांना मोहून टाकतो.