Pooja Sawant चा होणारा नवरा कोण? समोर आला चेहरा अन् आडनाव; पाहा PHOTOS

Pooja Sawant : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने अखेर आपल्या मिस्ट्री बॉयचं गुपित उघड केलं आहे. कोण आहे हा हँडसम मॅन.. ज्याच्याशी बांधणार लग्नगाठ.

| Nov 29, 2023, 12:08 PM IST

Pooja Sawant Engaged With Siddhesh Chavan : अभिनेत्री पूजा सांवतने मंगळवारी 28 नोव्हेंबर 2023 ला आपण Engaged झाल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. यावेळी तिने काही फोटो देखील शेअर केले होते. पण यामध्ये त्या मिस्ट्री बॉयचा चेहरा मात्र दाखवला नव्हता. यावरुन अनेकांनी तर्क वितर्क लावले होते. पण अखेर आज पूजाने मिस्ट्री मॅनचा चेहरा दाखवला आहे. Face Reveal करत पूजाने ही गुड न्यूज पुन्हा एकदा शेअर केली आहे. 

1/7

कोण आहे मिस्ट्री मॅन

Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan

पूजा सावंत सिद्धेश चव्हाणसोबत एंगेज झाली आहे. सिद्धेश चव्हाण नक्की काय करतो हे अद्याप कळलेलं नाही. पण चेहरा समोर आल्यामुळे गुपित समोर आलं आहे. 

2/7

शेअर केले होते खास फोटो

Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan

पूजाने आधी काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तिच्या बोटातील अंगठी दिसत होती. यावरुन पूजाचा साखरपुडा झाल्याच किंवा ती एंगेज झाल्याची माहिती मिळाली होती. 

3/7

खास पोस्ट

Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan

पूजाने सोशल मीडियावर 'तुझ्यासोबत प्रेमाच्या या नवीन प्रवासाची सुरुवात करण्यासाठी खूप आतुर आहे...' अशी छान पोस्ट लिहिली होती. यावेळी 'एन्गेज्ड इल लव्ह' असं कॅप्शनही दिलं होतं.

4/7

सिक्रेट रिलेशनशिप

Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan

पूजा सावंत सिद्धेश चव्हाणला डेट करत असल्याची माहिती खूप गुपित ठेवली होती. हे अतिशय सिक्रेट रिलेशनशिप होती. त्यामुळे चाहत्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. कमेंट करुन अनेकांनी विचारली होती माहिती.  

5/7

ही कमेंट ठरली लक्षवेधी

Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan

पूजाने फोटो पोस्ट करताच सिद्धार्थ चांदेकरने कमेंट केली होती. या कमेंटवरुन सिद्धार्थ आणि काही कलाकारांना सिद्धेश चव्हाणबद्दल माहिती असल्याचं दिसून आलं. सिद्धार्शने 'अँड द डिझ्नी फिल्म बिगिन्स' अशी कमेंट केली होती. 

6/7

चर्चांना उधाण

Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan

सिद्धार्थ चांदेकरने कमेंट केल्यावर पूजा सावंतचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण हा डिझ्नी कंपनीत कामाला असू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. एवढंच नव्हे तर तो परदेशात राहत असल्याचीही चर्चा आहे. आता पूजा आणि सिद्धेशच्या लव्हस्टोरी जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता आहे. या दोघांची पहिली भेट कुठे झाली ते प्रपोझ कुणी केलं? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

7/7

यांच्यासोबत जोडली गेली नावे

Actress Pooja Sawant revealed her Partner photo And Name Know More Details About Siddhesh Chavan

पूजा सावंत ही कायमच चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. कधी तिचा अभिनय, कधी तिचं प्राणी प्रेम तर कधी कलाकारांसोबत नाव जोडले जाणे. पूजा सावंतचं या अगोदर अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेता भूषण प्रधानसोबत नाव जोडलं गेलं होतं. पण अखेर या चर्चांना पूजानेच पूर्णविराम दिला आहे. आणि आपल्या हक्काच्या व्यक्तीसोबत खास असे फोटो शेअर केलेत.