मराठमोळ्या अभिनेत्रीची बॅचलर पार्टी

पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

Nov 09, 2020, 17:46 PM IST

अभिनेत्री सई लोकुर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना मोठा धक्काच दिला होता. आता तिने तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी साजरी केली. पार्टीचे काही फोटो देखील तिने इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सईच्या होणाऱ्या पतीचे नाव तीर्थदीप रॉय असं आहे. त्याच्यासोबत देखील तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. मात्र तिने विवाहाची तारीख अद्याप सांगितलेली नाही. 

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7