शर्मिला टागोर ठरलेल्या बिकीनी घालणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री

Dec 08, 2020, 10:17 AM IST
1/6

शर्मिला टागोर ठरलेल्या बिकीनी घालणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री

'काश्मीर की कली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आपल्या स्मितहास्यानं अनेकांनाच घायाळ करणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी कलाविश्वात आपलं वेगळं असं स्थान प्रस्थापित केलं.   

2/6

शर्मिला टागोर ठरलेल्या बिकीनी घालणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री

साचेबद्ध भूमिकांना शह देत हिंदी कलाविश्वात बोल्डनेसही तितक्याच शिताफीनं सादर करणाऱ्या या अभिनेत्रीनं 'ऍन इविनिंग इन पॅरिस' या चित्रपटात स्विमसूट लूकमध्ये कमालच केली. असं करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या होत्या.   

3/6

'काश्मीर की कली', 'वक्त', 'आराधना' या चित्रपटातून त्या विशेष प्रसिद्धीझोतात आल्या.   

4/6

शर्मिला टागोर ठरलेल्या बिकीनी घालणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री

'फिल्मफेअर' या मासिकाच्या 1966 मधील अंकासाठी शर्मिला यांनी टू पीस बिकिनी फोटोशूट केलं होतं.   

5/6

शर्मिला टागोर ठरलेल्या बिकीनी घालणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री

टू पीस बिकिनी लूकमुळं त्या बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. कोणा एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं अशा लूकमध्ये सर्वांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती.   

6/6

शर्मिला टागोर ठरलेल्या बिकीनी घालणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री

'ऍन इविनिंग इन पॅरिस' या चित्रपटाच्या वेळचा एक अत्यंत रंजक किस्सा सिनेरसिकांचं आजही लक्ष वेधतो. त्यावेळी शर्मिला (Sharmila Tagore) आणि मंसूर अली खान पटौदी (Mansoor Ali Khan Pataudi ) हे रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हाच मंसूर यांची आई, शर्मिला यांना भेटण्यासाठी मुंबईला येणार होती. इथं मुंबईत सर्वत्र स्विमसूटमधील शर्मिला टागोर यांचे फोटो लावले होते. आता मंसूर यांची आई मुंबईत येणार असल्याचं ऐकत शर्मिलांना धडकीच भरली. त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांशी तातडीनं संपर्क साधत चित्रपटाचे पोस्टर्स शहराच्या प्रत्येक ठिकाणहून हटवले. (सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम)