Sobhita Dhulipala Photos : समंताला पाहून रडू आलं... ; गाली हळद लागताच शोभिता इतकं मोकळेपणानं बोलली

Sobhita Dhulipala Shares Wedding Photos : एकिकडे अभिनेता (Naga chaitanya) नागा चैतन्य याच्यासोबतच्या कथित रिलेशनशिपमुळं ती चर्चेत आलेली असतानाच दुसरीकडे तिनं शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांच्याच नजरा वळवल्या.   

| Apr 04, 2023, 09:06 AM IST

Sobhita Dhulipala Shares Wedding Photos : लग्न.... एक असा सोहळा जिथं फक्त दोन व्यक्ती एकमेकांची आयुष्यभरासाठी साथ देण्याचीच वचनं देत नाहीत तर, अनेक नाती जोडली जातात. एक असा सोहळा जिथं अनेकांचे स्वभावगुण कळतात, आनंदाच्या असंख्य क्षणांची उधळण करणारा हाच तो क्षण. सध्या या  सर्वच क्षणांचा अनुभव घेतला आहे अभिनेत्री शोभिता धुलिपालानं. 

 

1/7

sobhita dhulipala latest photos

Actress sobhita dhulipala on her sister samanta wedding shares a joyfull photos

कुठे शोभिता हळदी समारंभात हळदीनं माखलेली दिसली, तर कुठे प्रत्येक लहामनोठ्या क्षणाचा आनंद घेताना दिसली. मेहंदीपासून संगीतपर्यंत प्रत्येक सोहळ्यासाठी तिनं खास वेशभूषेला पसंती दिली होती. तिचा लूक सर्वांमध्ये अधिकच उठावदार दिसत होता. बरं या साऱ्यामध्ये समंताला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. 

2/7

sobhita dhulipala movies

Actress sobhita dhulipala on her sister samanta wedding shares a joyfull photos

शोभिता... समंता... काहीतरी गोंधळ होतोय का? नागा चैतन्य आठवतोय? इथं त्याचा काहीही संबंधच नाही. कारण, ही समंता म्हणजे शोभिताची बहीण. तिच्याच लग्नाच्या निमित्तानं शोभितानं गेले काही दिवस धमाल केली. 

3/7

sobhita dhulipala sister

Actress sobhita dhulipala on her sister samanta wedding shares a joyfull photos

बहिणीच्या लग्नातील प्रत्येक क्षण शोभितानं चाहत्यांच्या भेटीला आणला. दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय अशा पद्धतींनी पार पडलेल्या या विवाहसोहळ्याच्या निमित्तानं तिचं कुटुंबही सर्वांनाच पाहता आलं. 

4/7

sobhita dhulipala family

Actress sobhita dhulipala on her sister samanta wedding shares a joyfull photos

जबाबदार बहीण, म्हणून शोभितानं अतिशय सुरेखपणे समंताच्या लग्नाची सर्व व्यवस्था पाहिली होती. ती कामात इतकी व्यग्र होती, की सुरुवातीचे काही समारंभ तिला छानसं तयारही होता आलं नव्हतं. एका पोस्टमधून तिनं याची खंतही व्यक्त केली. 

5/7

sobhita dhulipala age

Actress sobhita dhulipala on her sister samanta wedding shares a joyfull photos

'तारा खन्ना', या 'मेड इन हेवन'मधील पात्राचा उल्लेख करत आपण नियोजन आणि हिशोबामध्येच गुंतल्याचं तिनं सांगितलं. 'तो क्षण अतिशय भावनिक होता, किंबहुना मला रडूही आलं कारण समंताला मी पहिल्यांदाच असं वधुरूपात पाहिलं होत', असं तिनं एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.   

6/7

sobhita dhulipala instagram

बहिणीला मेहंदी लावता आली नाही याची खंत शोभिताला राहिली, पण तिच्यासाठीच सर्व व्यवस्था केली आणि सर्वांना ती आवडलीसुद्धा याचा दिलासाही तिला होता. 

7/7

sobhita dhulipala

Actress sobhita dhulipala on her sister samanta wedding shares a joyfull photos

(सर्व छायाचित्रं- शोभिता धुलिपाला/ इन्स्टाग्राम )