पूरग्रस्तांच्या नजरेस नजर देणंही कठीण- उर्मिला मातोंडकर

Jul 28, 2021, 17:05 PM IST
1/5

मुसळधार पावसाचा तडाखा बसल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातच याचे परिणाम दिसून आले. राज्यातील कोकण भागावर पूराचं संकट ओढावलं आणि पाहता पाहता होत्याची नव्हतं झालं. गावच्या गावं पूराच्या पाण्याखाली गेली आणि यामध्ये कोकणवासियांची स्वप्नही गुदमरली.   

2/5

पूरग्रस्तांच्या पुढे आता जगण्याचा मोठा संघर्ष असतानाच अनेक स्तरांतून त्यांना मदतीचा हात दिला जात आहे. कलाकार मंडळींपासून अगदी राजकीय नेतेमंडळी आणि सर्वसामान्य नागरिकही यासाठी पुढे सरसावले आहेत.   

3/5

अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही नुकतंच कोकणातील पूरग्रस्त भागाला भेट देत तेथील नागरिकांची भेट घेतली.   

4/5

पूराचा तडाखा बसलेल्या या मंडळींना भेट देत असताना उर्मिला यांच्यापुढे तेथील दाहक वास्तव उभं राहिलं.   

5/5

महाडमधील एका खेड्याला भेट देत उर्मिला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अनुभवाचं कथन केलं. तिथं जाऊन पूरग्रस्तांच्या नजरेस नजर देणं आणि त्यांचा आत्मविश्वास आणखी बळकट करणं ही अतिशय आव्हानात्मक बाब, असं लिहित त्यांनी काही छायाचित्रंही शेअर केली. (सर्व छायाचित्र- उर्मिला मातोंडकर / ट्विटर)