'अदाई' फेम अमाला न्यूड सीनमुळे प्रकाशझोतात
'आदाई' चित्रपट गेल्या बऱ्याच दिवसांपासून फक्त प्रेक्षकांचच नव्हे, तर इतर क्षेत्रातील व्यक्तींचंही लक्ष वेधत आहे.
मुंबई : रूपेरी पडद्यावर अनेक चित्रपट दाखल होतात. काही हीट होतात तर काही फ्लॉप. अनेक चित्रपट तर वादाच्या भोवऱ्यात अडकतात. असाच एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'आदाई' चित्रपट गेल्या बऱ्याच दिवसांपासून फक्त प्रेक्षकांचच नव्हे, तर इतर क्षेत्रातील व्यक्तींचंही लक्ष वेधत आहे. अभिनेत्री अमाला पॉल हिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या एका दृश्यामुळे, म्हणजेच न्यूड सीनमुळे अनेक चर्चांना उधाण आलं. चित्रपट प्रदर्शित झल्यानंतर कथेची आणि अमालाच्या अभिनयाचे कैतुक होत आहे.