पती कर्णधार तर पत्नी...; 'या' क्रिकेटपटूची बायको करते वाईन टेस्टिंगचं काम!

एडन मार्करामला आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार बनवण्यात आलंय. दरम्यान त्याची पत्नी निकोल डॅनिएली ओ कॉनर एक आगळं-वेगळं काम करते.

Feb 24, 2023, 22:32 PM IST
1/5

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर एडन मार्करामच्या क्रिकेट करिअरमध्ये मोठा बदल झालाय. हा खेळाडू आता जगातील सर्वात मोठी लीग IPL चं नेतृत्व करताना दिसणार आहे. सनरायझर्स हैदराबादने मार्करामला नवा कर्णधार बनवलंय.

2/5

त्याच्या या कामगिरीमागे त्याच्या पत्नीचा मोलाचा वाटा आहे. मार्करामची पत्नी निकोल डॅनिएली ओ'कॉनर अनेकदा पतीला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये येते.

3/5

नुकताच त्यांचा एक भावूक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये निकोल रडताना दिसली. एसए20 लीगमध्ये एडन मार्करामने शतक झळकावल्यामुळे निकोलच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. 

4/5

एडन मार्करामच्या किरयरबद्दल संपूर्ण जगाला माहितीये. त्याची पत्नीबद्दल फारसं कोणाला माहिती नसेल. निकोल एक उद्योजिका असून तिचा ऑनलाइन दागिन्यांचा व्यवसाय आहे.

5/5

याशिवाय वाईन टेस्टिंगचे कामंही निकोल करते. निकोल वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन चाखल्यानंतर त्याच्या गुणवत्तेबद्दल ती माहिती देते.