Aditya Thackeray : ‘यंग ग्लोबल लीडर्स’च्या यादीत आदित्य ठाकरेंचा समावेश; असा झाला राजकारणात प्रवेश

Aditya Thackeray : या यंग ग्लोबल लीडर्स’च्या यादीत 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुण नेत्यांचा समावेश आहे. या यादीत आदित्य ठाकरे यांना स्थान मिळाले आहे. 

Mar 15, 2023, 21:32 PM IST

Aditya Thackeray In Young Global Leaders : शिवसेनेचे युवा नेते ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा समावेश ‘यंग ग्लोबल लीडर्स’च्या यादीत झाला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (World economic foram)  ही यंग ग्लोबल लीडर्स’ची यादी प्रसिद्ध केली आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

1/10

यंग ग्लोबल लीडर्स क्लास -2023 यादीत आदित्य ठाकरेंसह  वेगवेगळ्या गटांमध्ये 6 भारतीयांचा समावेश आहे. यासह भाजप युवा विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांचा समावेश आहे, तर टीव्हीएस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, बायझीनचे कार्यकारी संचालक विबिन जोसेफ, उद्योग गटात जियो हॅप्टिक टेक्नॉलॉजीच्या आकृती वैश, आणि थिंक टँक गटात तन्वी रत्ना यांचा समावेश आहे. 

2/10

'यंग ग्लोबल लीडर्स’च्या यादीत समाज, देश, जगभरात सकारात्मक आणि चिरस्थायी बदलांसाठी काम करणारे राजकीय नेते, कल्पक उद्योजक, संशोधक आणि दूरदर्शी कार्यकर्ते अशा जवळपास 100 जणांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे यांच्या नावाचा पब्लिक फिगर गटात समावेश करण्यात आला आहे.

3/10

आदित्य ठाकरे यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 

4/10

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. पक्ष संघटना नव्याने मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. 

5/10

आदित्य ठाकरे यांचा जन्म 13 जून 1990 मध्ये झाला. 

6/10

आदित्य ठाकरे आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतात. 

7/10

आदित्य ठाकरे यांना आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि वडिल उद्धव ठाकरे यांच्यामुळे बालवयापासूनच त्यांनी राजकारण अगदी जवळून पाहिले.   

8/10

आदित्य ठाकरे अनेकदा आई रश्मी ठाकरे यांच्यासह देखील अनेक कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होतात. 

9/10

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरे यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी होती. ती त्यांनी योग्यरित्या सांभाळली. 

10/10

'यंग ग्लोबल लीडर्स’च्या यादीत आदित्य ठाकरेंसह 6 भारतीयांचा समावेश आहे.