पिवळ्या साडीनंतर निळ्या ड्रेसमधली मतदान अधिकारी व्हायरल

देशात लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात दाखल झालीय. नेत्यांच्या घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोप यांच्या चर्चां दरम्यान दोन निवडणूक महिला अधिकाऱ्यांचीही जोरदार चर्चा झालीय. यातच एका निळ्या रंगाचा ड्रेस परिधार केलेल्या महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत

May 16, 2019, 13:09 PM IST

या अगोदर लखनऊत पिवळ्या साडीत दिसलेल्या एका महिला अधिकाऱ्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. या महिला अधिकाऱ्याच्या बुथवर १०० टक्के मतदान नोंदवलं गेल्याचीही म्हटलं गेलं

1/5

भोपाळची रहिवासी

भोपाळची रहिवासी

१२ मे रोजी सहाव्या टप्प्यात दिल्लीसहीत देशभरातील ५९ जागांवर मतदान पार पडलं. ही महिला ईव्हीए हातात घेऊन जाताना या फोटोंत दिसत आहे. मतदान केंद्रावर रवाना होण्यापूर्वीचे हे फोटो आहेत. ही महिला भोपाळची रहिवासी आहे.

2/5

मतदान अधिकारी

मतदान अधिकारी

मतदान केंद्रावर ड्युटी बजावण्यासाठी निघालेल्या या महिलेचे फोटो समोर आले आणि पाहता पाहताच ते व्हायरल झाले. या महिलेची ड्युटी भोपाळच्या बुथ क्रमांक १०० गोविंदपुरा आयटीआयमध्ये लागली होती. 

3/5

योगेश्वरी बँक कर्मचारी

योगेश्वरी बँक कर्मचारी

राजधानीच्या कुंजन नगर स्थित कॅनरा बँकमध्ये ही महिला काम करते. योगेश्वरी गोहिते असं त्यांचं नाव आहे. गेल्या वर्षभरापासून पीओ पदावर त्या कार्यरत आहे. यापूर्वी त्या जम्मूमध्ये कार्यरत होत्या.

4/5

पती सेनेत मेजर

पती सेनेत मेजर

योगेश्वरी यांचे पती सेनेत मेजर पदावर कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगा - रोमिल गोहिते आहे. योगेश्वरी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना मॉडलिंगची आवड नाही मात्र स्वत:वर त्या लक्ष देतात. सोबतच घर सजवण्याचीही त्यांना आवड आहे. 

5/5

कामासोबत ओळख

कामासोबत ओळख

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंबद्दल विचारलं असता, मला माझ्या कामामुळे ओळखलं गेलं तर आनंद मिळतो... मी ड्युटीवर असताना हा फोटो काढण्यात आला... कामासोबत ओळख मिळाल्यानं मी त्याला सकारात्मकदृष्टीनेच पाहते, अशी प्रतिक्रिया योगेश्वरी यांनी व्यक्त केली