हवाई दलाच्या तळावर हॅण्डग्रेनेड सापडले, फोटो व्हायरल

हवाई दलाच्या शाळेच्या मैदानात हा संशयास्पद पदार्थ दिसून आला.

May 15, 2019, 18:43 PM IST

पुणे : पुण्यातील हवाई दलाच्या तळावर एक विशिष्ट प्रकारचा स्फोटक सदृश्य पदार्थ आढळून आला आहे. हवाई दलाच्या शाळेच्या मैदानात हा संशयास्पद पदार्थ दिसून आला. हा पदार्थ आता तपासणीसाठी तेथील एका प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. विंग कमांडर पी एन सिंह यांना मंगळवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी असा पदार्थ आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पुणे पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून, पोलिसांना देखील याची माहिती दिली. 

1/4

फटाक्यांमध्ये वापरला जातो 'हा' पदार्थ

फटाक्यांमध्ये वापरला जातो 'हा' पदार्थ

स्फोटक वस्तू एखाद्या हॅण्डग्रेनेड सारखी दिसतेय. त्याचा उपयोग फटाके बनवण्यासाठी करण्यात येतो. फटाक्यांमध्ये वापरले जाणारे रसायन या पदार्थामध्ये आढळून आलं आहे.

2/4

फॉरेन्सिक चाचणीनंतर होणार खुलासा

फॉरेन्सिक चाचणीनंतर होणार खुलासा

डीसीपी मितेश गट्टे यांच्या माहितीनुसार हा स्फोटक हॅण्डग्रेनेड असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. फॉरेन्सिक चाचणीनंतर हा पदार्थ नक्की काय आहे, हे कळेल.

3/4

क्षेत्र अत्यंत संवेदनशील मानले जाते

क्षेत्र अत्यंत संवेदनशील मानले जाते

वायुसेनेच्या परिसरात हा पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य तसेच संवेदनशीलता लक्षात घेता त्याबाबतची माहिती प्रसारीत करण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. 

4/4

पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा

पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा

संरक्षण दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या लोहगाव हवाई दल तळ परिसरात हा प्रकार घडलाय. त्यामुळे जोपर्यंत त्याचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत संशयास्पद वस्तूबद्दलचे गूढ कायम राहणार आहे.