युजवेंद्र चहल याच्यानंतर हे भारतीय क्रिकेटपटू लवकरच 'क्लीन बोल्ड' होऊ शकतात

 अनेक भारतीय क्रिकेटपटूही भविष्यात लग्न करू शकतात. एक नजर टाकू या. हे चार खेळाडू ‘क्लीन बोल्ड’ होऊ शकतात.

Dec 24, 2020, 11:12 AM IST

मुंबईः टीम इंडियाचा  (Team India) लेगस्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal ) आपल्या लग्नाच्या बातमीने अचानक सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. चहलने २२ डिसेंबर रोजी आपली प्रियसी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिच्याशी  लग्न केले. त्यांच्याखेरीज इतर अनेक भारतीय क्रिकेटपटूही भविष्यात लग्न करू शकतात. एक नजर टाकू या. हे चार खेळाडू ‘क्लीन बोल्ड’ होऊ शकतात.

1/4

 भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल (KL Rahul) गेल्या काही दिवसापासून चांगले प्रदर्शन करत आहे. राहुल एकदिवसीय आणि टी -२० क्रिकेटमध्ये भारताला सामना जिंकून देणारी कामगिरी बजावत आहे. केएल राहुलच्या लव्ह लाइफविषयी सांगयचे झाले तर बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टीला डेट करत आहे. राहुल सोशल मीडियावर अथियाबरोबर बरेचवेळा फोटो शेअर करतो. जरी या दोघांनी अद्याप नात्यात असल्याची कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावर या दोघांच्या छायाचित्रांवरून हे दिसून येते की या जोडप्यामध्ये निश्चितच जवळचे नाते आहे. या दोघांचे लवकरच लग्न होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

2/4

टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आपली गर्लफ्रेंड ईशा नेगी (Isha Negi) सोबतच्या संबंधांबद्दल बर्‍याचदा चर्चेत आहे. ईशा देहरादूनची असून ती इंटिरियर डिझायनर आहे. पंतशी असलेले संबंध उघड झाल्यापासून सोशल मीडियावर ईशाचे फॉलोअर्स वाढले आहेत. ईशा नेगी इंस्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. पंतने काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती. असे सांगितले जात आहे ऋषभ पंत आणि ईशा नेगी लवकरच लग्न करू शकतात.

3/4

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दक्षिणमधील एका अभिनेत्रीला डेट करीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार तेलुगु अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन (Anupama Parameswaran) आणि बुमराह रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांनी अद्याप आपल्या नात्याविषयी सांगितलेले नाही. परंतु या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे.

4/4

मुंबई इंडियन्सचा फलंदाज आणि भारतीय क्रिकेटपटू ईशान किशन (Ishan Kishan) गर्लफ्रेंड अदिती हुंडिया (Aditi Hundia) हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अदिती प्रोफेशननुसार मॉडेल असून तिने मिस इंडिया २०१७ मध्ये भाग घेतला आहे. तिने मिस इंडिया राजस्थानचा मुकुटही परिधान केला आहे. आदितीने ईशान किशनसोबतचा फोटो सोशल मीडियावर अनकेदा शेअर केले आहेत. ईशान किशनची मैत्रीण विराट कोहली आणि एमएस धोनी हेदेखील खूप मोठे चाहते आहेत. तिला क्रिकेट खूप आवडते. असे सांगितले जाते की, ईशान किशन लवकरच अदितीशी लग्न करू शकेल.