Ajinkya Rahane : रहाणे बनला 360° प्लेयर; पठ्ठ्याचा स्कूप शॉट पाहिलात का?

Ajinkya Rahane : अजिंक्यने आजच्या सामन्यात हा स्कूप शॉट मारला असून याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Apr 23, 2023, 22:15 PM IST
1/5

आज कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सामना रंगला आहे. या सामन्यात चेन्नई सोडून मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या खेळीची सगळीकडे चर्चा होताना दिसतेय.

2/5

केकेआर विरूद्धच्या सामन्यात अजिंक्यने एक असा शॉट मारला की, त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 13 व्या ओव्हरमध्ये उमेश यादवच्या गोलंदाजीवर अजिंक्यने हा शॉट खेळला.

3/5

उमेशचा बॉल चांगला स्विंग होत होता. या ओव्हरमध्ये उमेशने बॉल टाकला आणि अजिंक्यने आपली जागा बदलली. यावेळी तो ऑफ स्टंम्पच्या बाहेर गेला आणि एक भन्नाट स्कुपसारखा फटका लगावला.  

4/5

मुळात यावेळी अजिंक्यचं टायमिंग इतकं उत्तम होतं की, हा बॉल थेट बाऊंड्रीच्या पार गेला. 

5/5

आजच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने 24 बॉल्समध्ये अर्धशतक झळकावलं आहे. एकूण 29 बॉल्समध्ये त्याने 71 रन्सची खेळी केली.