निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान, कशाचा बोडक्याचा गतिमान? - अजित पवार

Ajit Pawar : जालना दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नवीन साखर गाळप युनिटचं उद्घाटन केले. त्यावेळी अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

Mar 26, 2023, 16:08 PM IST

Ajit Pawar : निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान म्हणत राष्ट्रावादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे - फडणवीस सरकारच्या जाहिरातीवरुन जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांनी यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरुनही सरकारवर निशाणा साधला आहे. 

1/6

ajit pawar on Budget session

कायदा, घटनेनुसार राज्य चाललं आहे का याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. याबद्दल अधिवेशनाच्या चार आठवड्यांमध्ये काहीच सांगितले गेले नाही. महागाई आकाशाला भिडली आहे. शेतमजुरांनी, गरीब माणसांनी जगायचे कसे? याचे उत्तर सरकार द्यायला तयार नाही.

2/6

ajit pawar on anandacha shida

गुढीपाढव्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत आनंदाचा शिधा देणार असल्याचे सांगितले. कशाचा आनंद? तुम्ही तिथे घेता आणि आनंदाचा शिधा देता किती एक एक किलो. घरात पाच माणसे असताना एक किलो यांच्या काकाने खाल्लं आहे का?

3/6

ajit pawar angry on anandacha shida

एक किलो रवा, तेल, डाळ आणि साखर देणार आहेत. चार किलोमध्ये काय होणार आहे कुणाला माहिती. तुम्ही तुमचे कुटुंब यामध्ये रावबून दाखवा. चेष्टा, मस्करी चालली आहे.

4/6

maharashtra government advertisement

सगळीकडे निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान लावले गेले आहे. कशाचा बोडक्याचा गतिमान. काय गतिमान? तुम्ही रोज तुमचे फोटो आम्हाला बळजबरीने बघायला लावता. पेपर उघडल्यावर यांचे फोटो असतात. याऐवजी शेतकऱ्यांसाठी काय केले ते सांगा ना.

5/6

ajit pawar baramati

आम्ही राज्यकर्ते नव्हतो का? पण आम्ही अशा पद्धतीने जाहीरतबाजी केली नाही. मी बारामतीमधून निवडून आलो आणि रोज जाहिरात द्यायला लागलो तर लोक म्हणतील आम्ही जाहिरात द्यायला निवडून दिले आहे का? एखाद्या दिवशी जाहिरात दिली तर समजू शकतो.

6/6

ajit pawar on election

त्यांना आता भीती वाटत आहे. अधिकाऱ्यांकडे याबाबत मी विचारणा केली तेव्हा त्यांनी मला सांगितले की, सरकार आल्यानंतर पदवीधर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले.