"माझी जरी भट्टी असेल तरी मला पकडा अन् टायरमध्ये घाला"; असं का म्हणाले अजित पवार

Ajit Pawar :राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आपल्या कडक स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. जवळचा कोणीही पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता असो किंवा प्रशासनातील कोणताही अधिकारी असो. जो चुकीचे काम करतो त्याची  अजित पवार जाहीरपणे कान उघडणी करतात.

May 22, 2023, 18:13 PM IST
1/5

NCP Ajit Pawar

अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओखळले जातात. अनेकदा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना सुनावताना देखील दिसत असतात. भर सभेत अजित पवार हे त्यांच्याजवळ समस्या घेऊन येणाऱ्या लोकांना त्यांच्या खास शैलीत मदत करतात.

2/5

ajit pawar speech

असाच काहीसा प्रकार बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी गावात सभेदरम्यान घडला. अजित पवार बोलत असताना पाहुणेवाडी गावातील नागरिकांनी पाहुणेवाडी गावात अवैधरित्या दारूबंदी सुरू असल्याची तक्रार केली आणि अजित पवारांनी पोलिसांना धारेवर धरत पोलिसांची कान उघडणी केली.

3/5

ajit pawar on illegal liquor

आता पोलिसांची कामे शरद पवार सुप्रिया सुळे आणि मी करतो. पोलीस प्रशासन निवांतपणे आपला पगार घेईल, पाहुणेवाडी गावातील अवैध हातभट्ट्या आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मी शोधत बसतो, असे अजित पवार म्हणाले.

4/5

ajit pawar angry on police

पोलीस प्रशासनाला मी वारंवार सांगितला आहे की मी कोणत्याही कामात हस्तक्षेप करत नाही. मात्र पोलिसांच्या या अशा कर्तुत्वाला मी सॅल्यूटच करतो, असा उपहासात्मक टोला अजित पवारांनी पोलीस प्रशासनाला लगावला.  

5/5

ajit pawar at baramati

माझी जरी भट्टी असेल तरी मला पकडा अन् टायरमध्ये घाला असे म्हणतात सभेमध्ये एकच हशा पिकला. यामुळे आता बारामती मधील पोलीस प्रशासन बारामती तालुक्यातील हातभट्टी व्यवसायिक धारकांवर कारवाई करणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. (सर्व फोटो  - PTI)