अडल्ट चित्रपट असूनही OMG 2 नं केला असा पराक्रम

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याच्या 'ओएमजी 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये एकवेगळीच चर्चा सुरु होती. ती म्हणजे चित्रपटाच्या पटकथेची... चित्रपटाची पटकथा आणि त्यात असलेल्या डायलॉग्समुळे वेगळाच वाद सुरु झाला होता. पण तरीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 

| Aug 29, 2023, 16:36 PM IST
1/8

'ओएमजी 2'

omg 2 is 4th highest grossing adult film

अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' या चित्रपटाला  प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्यासोबत 'गदर 2'  हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे.  

2/8

चित्रपटाला मिळालं 'ए' सर्टिफिकेट

omg 2 is 4th highest grossing adult film

अक्षय कुमारच्या या चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट मिळालं आहे. 

3/8

स्वत: 'या' अभिनेत्याला पाहता आला नाही चित्रपट

omg 2 is 4th highest grossing adult film

अक्षय कुमारच्या या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांच्या मुलाची भूमिका साकारणारा आरुष वर्मा हा आता 16 वर्षांचा असल्यानं त्याला देखील हा चित्रपट पाहता आला नाही.   

4/8

अक्षयच्या या चित्रपटानं केला नवा रेकॉर्ड

omg 2 is 4th highest grossing adult film

'ओएमजी 2' या चित्रपटानं 17 दिवसात 135 कोटींची कमाई केली आहे. 

5/8

'A' म्हणजेच एडल्ट सर्टिफिकेट मिळालेल्या चित्रपटात चौथ्या क्रमांकावर

omg 2 is 4th highest grossing adult film

अक्षयच्या या चित्रपटानं रितेश देशमुखच्या 'ग्रॅंड मस्ती' या चित्रपटाला देखील मागे टाकलं आहे. त्या चित्रपटानं 102.21 कोटींची कमाई केली होती. 

6/8

कबीर सिंग

omg 2 is 4th highest grossing adult film

पहिल्या स्थानावर आहे शाहिद कपूरचा कबीर सिंग हा चित्रपट आहे. या चित्रपटानं 278.2 कोटींची कमाई केली होती. 

7/8

'द कश्मीर फाइल्स'

omg 2 is 4th highest grossing adult film

या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 252.90 कोटींची कमाई केली आहे.   

8/8

द केरला स्टोरी

omg 2 is 4th highest grossing adult film

'द केरला स्टोरी' या चित्रपटानं 242.20 कोटींची कमाई केली आहे. (All Photo Credit : Social Media)