Alia Bhatt Net Worth : आलिया भट्टची एकूण संपत्ती किती माहितीये?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज 15 मार्च रोजी 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलियासोबत पती रणबीर कपूर आणि राहा देखील आहे. आलियानं आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले. त्याशिवाय तिनं अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. तर चित्रपटांमध्ये आलियानं असावं असं अनेक निर्मात्यांना वाटतं. मग आता इतकी वर्षे काम केल्यानंतर आलियाची एकूण संपत्ती किती असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? पडला असेल तर चला जाणून घेऊया तिच्या एकूण संपत्तीविषयी...

| Mar 15, 2024, 10:55 AM IST
1/7

आलियाचा डेब्यू

आलियानं करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिला 12 वर्ष या क्षेत्रात झाले आहेत. इतक्या वर्षात आलियाची संपत्ती आहे हे जाणून घेऊया. त्या चित्रपटासाठी आलियाला 15 लाख रुपये मानधन मिळालं होतं. 

2/7

एका चित्रपटासाठी घेते इतके कोटी

आलिया एका चित्रपटासाठी 15 ते 20 कोटी मानधन घेतलं. तर एका जाहिरातीसाठी 1-2 कोटी मानधन घेते. 

3/7

आलियाचं एकूण नेटवर्थ

रिपोर्ट्सनुसार, आलियाचं एकूण नेटवर्थ हे 517 कोटीच्या जवळपास आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करते त्यासाठीही मानधन घेते. 

4/7

प्रोडक्शन हाऊस

2021 मध्ये आलियानं मुंबईत स्वत: चं एक प्रोडक्शन हाउस सुरु केलं. ज्याचं नाव 'इटरनल सनशाइन' असं आहे. 

5/7

बिझनेस

आलियानं स्वत: चं एक किड्स वेयर ब्रॅंड सुरु केलं आहे. त्यात लहाण मुलांचे कस्टमाइज्ड कपड्यांसोबत बॅग्सही मिळतात. याशिवाय मॅटरनिटी ड्रेसेस देखील मिळतात 

6/7

इन्व्हेस्टमेंट

आलियानं 2021 मध्ये कानपुरमध्ये असलेल्या अगरबत्ती आणि धूप बणवणाऱ्या Phool या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. ते मंदिरात चढवण्यात आलेल्या फुलांना गोळा करतात आणि त्याला रिसायकल करुन अगरबत्ती आणि धूप बनवतात. 

7/7

आलियाचे चित्रपट

आलियानं हायवे, डियर जिंदगी, बद्रीनाथ की दुल्हनिया, गलीबॉय, राजी, डार्लिंग्स, गंगूबाई काठियावाडी, ब्रह्मास्त्र आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (All Photo Credit : Alia Bhatt Instagram)