अमीषा पटेल आणि महात्मा गांधी यांचा काय संबंध? येथे वाचा

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलविषयी आपल्या सगळ्यांना माहित आहे. 'गदर' आणि त्यानंतर 'गदर 2' नं तिनं सगळ्यांना वेड लावलं. पण तुम्हाला माहितीये का की अमीषा पटेल आणि महात्मा गांधी यांचे काही संबंध आहेत. पण ते कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.  

| Jun 09, 2024, 18:12 PM IST
1/7

अमीषाचं थेट असं नाही पण तिच्या आजोबांचं गांधींशी खास संबंध होते. त्यांचं नाव रजनी पटेल असं होतं. रजनी पटेल हे भारतीय राजकारणी आणि बॅरिस्टर होते. त्यांचा जन्म हा सारसा येथे झाला होता. 

2/7

त्यांनी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीत भाग घेतला आणि किशोरवयातच दारूच्या दुकानांबाहेर केलेल्या आंदोलनामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

3/7

लंडनमध्ये शिकायला गेले असताना त्यांची भेट ही जवाहरलाल नेहरुंच्या संपर्कात आले. त्यांनी रजनी यांना स्वातंत्र्य चळवळीला पाठिंहा देण्यासाठी अमेरिका आणि इतर ठिकाणी प्रवास करण्यास प्रोत्साहन केले. 

4/7

रजनी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी नेहरु गेटवे ऑफ इंडियाला येऊन उभे होते. पण त्यांना ब्रिटिशांनी परवानगी दिली नाही आणि त्या ऐवजी जहाजावर अटक करुन नाशिक कारागृहात नेले. 

5/7

त्यानंतर त्यांनी बॅरिस्टर म्हणून करिअरला सुरुवात केली, तर 1960 च्या दशकात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जवळच्या लोकांपैकी एक होते.

6/7

1970 च्या सुरुवातीला त्यांना मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आले. तर मुंबईतील वरळी भागात असलेल्या नेहरू सेंटरची कल्पना त्यांनीच 1972 मध्ये मांडली होती. तिथे 

7/7

रजनी यांनी बकुल पटेल यांच्याशी लग्न केलं. तर त्यांच्या नातीचं नाव हे अमीषा पटेल असून ती बॉलिवूडमध्ये काम करते. त्यासोबत त्यांचा नातू अश्मित पटेल देखील बॉलिवूडमध्ये काम करतो. तर त्यांचे निधन हे 3 मे 1982 मध्ये झाले.