पीएम मोदींना किती पगार मिळणार? खासदार आणि मंत्र्यांना कोणत्या सुविधा मिळतात... जाणून घ्या

PM Modi Government 3.0 : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. मोदी 3.0 च्या शपथविधी सोहळ्याची संपूर्ण  तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रपदी भवनमध्ये शपथविधीचा सोहळा रंगणार असून यासाठी जवळपास 9000 पाहुणे उपस्थित राहाणार आहेत. 

Jun 09, 2024, 16:47 PM IST
1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी राजधानी दिल्लीत जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी आज सकाळीच राजघाटावर पोहोचले आणि ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीवर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या समाधीचं दर्शन घेतलं. तसंच वॉर मेमोरिलला भेट देऊन वीर जवानांना अभिवादन केलं. 9000 पाहुण्यांच्या उपस्थितीत मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. याबरोबरच कॅबिनेट मंत्रिमंडातील काही मंत्रीही शपथ घेतील.

2/7

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांना 1.66 लाक रुपये प्रती महिना पगार मिळेल. यात 50 हजार रुपये बेसिक, 3000 रुपये एक्सपेंस अलाउन्स,  45000 पार्लियामेंटरी अलाउन्स, 2000 रुपये डेली अलाउन्सचा समावेश असतो. पगाराशिवाय देशाच्या पंतप्रधानांना विविध सुविधा देखील मिळतात. यात सरकारी घर, एपीजी सुरक्षा व्यवस्था, सरकारी वाहन, एअरक्राफ्ट, आंतरराष्ट्रीय ट्रिप, फूड एक्सपेन्सेस, टेलिफोन कनेक्शन, कर्मचारी अशा सुविधा दिल्या जातात.   

3/7

याशिवाय पंतप्रधानांना परदेशा यात्रांसाठी सरकारकडून यात्रा भाडं, तिथे थांबण्याचा आणि जेवणाचा खर्चही दिला जातो. याशिवाय निवृत्तीनंतर पाच वर्षांपर्यंत निवासस्थान, वीज, पाणी, सुरक्षा व्यवस्था सुरु राहाते. याशिवाय अनेकक टॅक्स फ्री भत्तेही मिळतात. यात ट्रेन, विमानाची मोफत यात्रा, वैद्यकिय सुविधा आणि कार्यालयाचा खर्च म्हणून वर्षाला 100000 रुपयांचा समावेश असतो.

4/7

पंतप्रधनांबरोबरच लोकसभेत विजयी झालेल्या खासदारांना प्रतीमहिना 1 लाख रुपये पगार मिळतो. प्रत्येक पाच वर्षात त्यांच्या दररोजच्या भत्त्यातही वाढ केली जाते. पगाराशिवाय खासदारांना संसद सत्रात किंवा बैठकीत समावेशासाठी 2000 रुपयांचा भत्ता मिळतो. रस्ते प्रवासासाठी प्रती किलोमीटर 16 रुपये प्रवास भत्ताही दिला जातो.

5/7

खासदारांना आपल्या मतदारसंघासाठी 45000 रुपये भत्त आणि कार्यालय खर्चासाठी दर महिना 45 हजार रुपये मिळतात. निवृत्तीनंतर खासदारांना प्रती महिना 25000 पेन्शन मिळतं. याशिवाय सरकारी घर, वीज आणि टेलीफोनचा खर्चही सरकारकडून दिला जातो.

6/7

कॅबिनेट मंत्र्यांना पगाराशिवाय विविध सरकारी सुविधाही दिल्या जातात. कॅबिनेट मंत्र्यांना प्रती महिना 100000 पगार मिळतो. याशिवाय सरकारी निवासस्थान, सरकारी वाहन, ऑफिस स्टाफ यासारख्या सुविधा दिल्या जातात.

7/7

याशिवाय कॅबिनेट मंत्र्यांना दिल्लीत सरकारी निवासस्थान, प्रवास भत्ता, वाहन, चालक, वैद्यकिय सुविधा आणि सुरक्षा मिळते. स्टेशनरीसाठी 15000 रुपये दिले जातात. याशिवाय खासदारांच्या कुटुंबियांना मोफद वैद्यकीय सुविधा, ट्रेन आणि विमानाचं मोफत तिकटही दिलं जातं.