Pit Bull Bite: चुकुनही 'या' 5 कुत्र्यांना पाळू नका, कुटूंबासाठी असतात धोकादायक

Pit Bull Bite : कुत्रा पाळावं असं अनेकांना वाटतं आणि अनेकजन पाळतातसुद्धा. पण, कोणता कुत्रा जास्त हिंसक आहे किंवा कुत्रा पाळताना कोणत्या जातीचा तो पाळू नये अशा अनेक प्रश्न मनात असतात. आज आम्ही तुम्हाला अशा 5 कुत्र्यांबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यांना पाळणं हे तुमच्यासाठी हानीकारक ठरु शकतं.

Sep 09, 2022, 21:00 PM IST
1/5

American Pit Bull Terrier

हा कुत्रा जगातील सर्वात प्राणघातक कुत्र्यांपैकी एक आहे. या कुत्र्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, हा कुत्रा त्याच्या मालकालाही फसवू शकतो. या कुत्र्याच्या चाव्याच्या घटना जगाच्या अनेक भागांतून कायम येत असतात. अनेक देशांनी तर या कुत्र्यावर बंदीही घातली आहे.

2/5

Rottweiler

अनेक देशांनी ज्या कुत्र्यांवर बंदी घातली आहे अशा कुत्र्यांपैकी आणि एक म्हणजे रॉट वेलर हा कुत्रा. या कुत्र्याची ओळख म्हणजे त्याची चावण्याच्या शक्ती. या कुत्र्याचं वजन 35 किलो ते 48 किलोपर्यंत असतं.

3/5

Siberian Husky

Siberian Husky या कुत्र्याची गनना जरी आक्रमक कुत्र्यांमध्ये केली जात असली तरी या कुत्र्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यास ते खूप मैत्रीपूर्ण बनतात. या कुत्र्यांबाबत खास गोष्ट म्हणजे ते खाण्यासाठी आणि आपल्या मालकाच्या रक्षणासाठी खूप आक्रमक होतात.

4/5

Wolf Hybrid Dog

या जातींच्या कुत्र्यांचा जन्म, लांडगा आणि कुत्रा यांच्या मिश्रणातून होतो. ही गोष्ट या जातीच्या कुत्र्यांना अद्वितीय बनवते. अनेक शहरांमध्ये या जातीच्या कुत्र्यांनी दुसऱ्या कुत्र्यांना मारल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. त्यामुळेच अनेक ठिकाणी या कुत्र्यावर बंदी घालण्यात आली आहे.

5/5

Doberman Pinscher

या कुत्र्याची उंची थोडी जास्त असते आणि त्यासोबतच या कुत्र्यांचा धावण्याचा वेग देखील खुप जास्त असतो. हे कुत्रे अनोळखी लोकांना पाहून खूप आक्रमक होतात. म्हणूनच या कुत्र्यांना प्रशिक्षित करणं खूप महत्वाचं असतं. या कुत्र्यांच वजन 34 ते 45 किलो असतं.