OMG! या Bold आणि सुंदर मुलीला मिळत नाहीए BoyFreind, कारण ऐकून व्हाल हैराण

Marie Temara: प्रत्येक व्यक्तीला आपला जोडीदार (Partner) दिसायला सुंदर, उंचपूरा आणि पैसेवाला असावा अशी इच्छा असते. प्रत्येकाचंच हे स्वप्न पूर्ण होतं असं नाही. पण या सर्व गोष्टी असतानाही एका मुलीला मनासारखा जोडीदार मिळत नाहीए. आपली व्यथा तीने अनेक सोशल मीडियावर (Social Media) मांडली आहे. यासाठी तीने दिलेलं कारण हैराण करणारं आहे. एका कारणाने त्या मुलीला बॉयफ्रेंड (Boyfreind) मिळत नसल्याचं तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Apr 16, 2023, 19:02 PM IST
1/6

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार या मुलीचं नाव मेरी तेमारा  (Marie Temara) असं आहे. मेरी अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथं राहाते. मेरी 28 वर्षांची असून ती व्यवसायाने मॉडेल आहे. 

2/6

दिसायला सुंदर, आकर्षक आणि ग्लॅमरस असतानाही मेरीला चांगला जोडीदार मिळत नाहीए. याचं कारण आहे तिची उंची. मेरी तेमाराही सहा फूंटापेक्षाही अधिक उंच आहे.

3/6

मेरी तेमाराची उंची तब्बल 6 फूट 2 इंच इतकी आहे. एका डेटिंग अॅपवर तिला 6.3 उंच असलेला मुलगा सापडला. दोघांचंही बोलणंही सुरु झालं. पण जेव्हा तो मुलगा प्रत्यक्षात भेटला तेव्हा त्याची उंची केवळ 5.11 इतकीच होती. प्रोफाईलमध्ये त्याने खोटी माहिती दिली होती

4/6

अधिक उंचीमुळे मेरीला अनेकवेळा ट्रोलचा सामना करावा लागतो. तिच्या मैत्रिणीही तिला तुला कधीच बॉयफ्रेंड मिळणार नाही असं चिवडत असल्याचं मेरी सांगते. पण आता मेरीने आपलं मत बदललं आहे.

5/6

उंचीचा आणि प्रेमाचा काहीही संबंध नसल्याचं मेरी म्हणते. तिच्या मते तिच्यापेक्षा कमी उंचीचाही मुलगा जोडीदार म्हणून चालेल पण तो मनापासून प्रेम करणारा असावा असं ती म्हणते.

6/6

मेरी एकटीच नाही, तर मेरीच्या कुटुंबात सर्वच उंच आहे. मेरीच्या आईची उंची 6.5 इतकी आहे. तर तिच्या वडीलांची उंची तब्बल 6.3 इतकी आहे. एका भावाची उंची 6.10 आणि लहान भावाची उंची 6.9 इतकी आहे.