Weight Loss Tips: वाढत्या वजनाची चिंता सतावतेय? पपई खाल्लानं होईल Flat Tummy

Weight Loss Tips: वजन कमी करणं म्हणजे खूप मेहनत करावी लागते. त्यासाठी मध्येच सोडून असं होत नाही. बऱ्याचवेळा खूप स्ट्रिक्ट डायट आणि हेवी वर्कआऊट करावं लागतं. पण अनेकवेळा असं होतं की आपल्याला जितकं अपेक्षित आहे. तितकं कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला अशा फळांचे सेवण करण गरजेचं आहे, जी तुम्हाला लगेच बाजारात मिळतील आणि ती शोधण्यासाठी तुमचा बराच वेळ जाणार नाही. इतकंच काय तर त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. ते फळ म्हणजे पपई. पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. 

| Apr 16, 2023, 18:28 PM IST
1/7

Weight Loss Tips papaya

नाश्ता - सकाळी नाश्ताय तुम्ही पपई खाऊ शकता. नाश्त्यात पपईच सॅलेड खा त्यानं तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळतात. तर हे ओट मिल्कसोबत खाल्यास तुम्हाला लवकर भूक लागत नाही. 

2/7

Weight Loss Tips papaya

दुपारच्या जेवणात - दुपारच्या जेवणाच्या वेळी देखील तुम्ही पपईचे सेवन करु शकता. त्यात जर तुम्ही पालक, टोमॅटो, मीठ, लसून आणि लिंबूचा रस घातला तर त्यातील न्यूट्रिशन्सचे प्रमाणे वाढते. असं खायचं नसेल तर तुम्ही पपईचा ज्युस पीऊ शकता. यानं वजन लवकर कमी होईल.

3/7

Weight Loss Tips papaya

संध्याकाळचा नाश्ता - संध्याकाळी देखील नाश्त्यात तुम्ही पपईचे सेवन करू शकता. यासाठी पपई आणि अननसची स्मुदी तयार करा, त्यानं तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. 

4/7

Weight Loss Tips papaya

रात्रीच्या जेवणात - रात्रीच्या जेवणात देखील तुम्ही पपई ठेवू शकतात. रात्रीचं जेवण झाल्यानंतर तुम्ही स्वीट डिश म्हणून पपईचे सेवन करा. यानं शरीरातील फक्त फॅट कमी होणार नाहीत तर बॉडी डिटॉक्स होण्यासही मदत होईल.

5/7

Weight Loss Tips papaya

अपचन आणि जळजळपासून सुटका - पपईमध्ये असलेले प्रोटिन हे पचन करण्यास आणि जळजळ कमी होण्यास महत्त्वाची ठरतात. त्यामुळे रोजच्या आहारात पपईचा समावेश केल्यास नक्कीच फायदा होईल

6/7

Weight Loss Tips papaya

रोगप्रतिकार शक्ती वाढते - पपईमध्ये व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात असतं. तर व्हिटामीन ई असणाऱ्या फळांचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते.

7/7

Weight Loss Tips papaya

हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम - जर आपल्या शरीरात व्हिटामीन के ची कमतरता असेल तर हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. व्हिटामीन के हे कॅलिशियम शोषण घेण्यास हाडांना मदत करते. (All Photo Credit : File Photo) (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)