जेव्हा Amitabh Bachchan यांचं नाव जोडलं गेलं होतं इराणी डान्सरशी, तेव्हा अभिनेत्याने रेखाला का लगावली कानशिलात?

Amitabh Bachchan Slapped Rekha : मेगास्टार अमिताभ बच्चन आणि एव्हरग्रीन रेखा यांच्या अफेयरबद्दल आजही चर्चा होते. पण तुम्हाला माहितीय का एकदा अमिताभ यांनी रेखा यांच्या कानशिलात लगावली होती आणि तेही एका इराणी डान्सरमुळे...काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घ्या.     

| Aug 06, 2024, 14:00 PM IST
1/10

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक लव्ह स्टोरी आहेत ज्या अपूर्ण राहिल्यात पण आजही त्यांची चर्चा होते. त्यातील एक आहे 80 च्या दशकातील गाजलेली अमिताभ बच्चन आणि रेखा यांची. ही लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली. अमिताभ यांनी जया भादुरी यांच्याशी लग्न केलं. पण अमिताभ - रेखा यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना आजही जाणून घ्यायला आवडतं.   

2/10

80 च्या दशकात अमिताभ-जया आणि रेखा यांच्या लव्ह ट्रँगलची बरीच चर्चा रंगली होती. पण लविरस या चित्रपटाच्या वेळी एका सुंदर इराणी डान्सरशी अमिताभ यांचं नाव जोडल्या गेलं होतं. अमिताभ आणि इराणी डान्सरमध्ये अफेयर सुरु आहे अशी अफवा पसरली होती.   

3/10

ही बातमी जेव्हा संपूर्ण इंडस्ट्री आणि मीडिया जगतात पसरल्यानंतर रेखाच्या कानावर पोहोचली तेव्हा त्या अवस्थ झाल्या. त्यांनी अमिताभ यांना या अफेयरबद्दल विचारलं.   

4/10

पण अमिताभ आणि रेखामधील या संवादाचं रुपांतर वादात झालं आणि रागाच्या भरात बिग बी यांनी रेखा यांच्या कानशिलात लगावली.   

5/10

अमिताभच्या या कृतीमुळे रेखाही खूप दुखावल्या गेल्या होत्या. अशा परिस्थितीत रेखा यांनी अमिताभ बच्चन आणि जया यांच्यासोबत 'सिलसिला' या प्रसिद्ध चित्रपटात काम करण्यास नकार दिला. 

6/10

मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांनी रेखा यांची समजूत घातली आणि हा चित्रपट करण्यास रेखा यांनी होकार दिला. जर रेखा या चित्रपटात नसत्या तर हा चित्रपट नक्कीच एवढा हिट झाला नसता, यात काही शंका नाही.  ृ

7/10

अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या बातम्या ही केवळ अफवा नव्हती हे सगळ्यांनाच माहीत आहे. कारण रेखा यांनी अनेकदा याबद्दल उघडपणे भाष्य केलंय. 

8/10

पण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नात्याबद्दल नकार दिला आहे. रेखाने एकदा उघडपणे यावर भाष्य करत म्हणाल्या होत्या की, 'अमिताभ यांनी त्यांच्या कठोर प्रतिमा आणि कुटुंबासाठी हा निर्णय घेतलाय, जे माझ्या मते योग्य आहे.'

9/10

रेखा असंही म्हणाल्या होत्या की, 'त्यांनी हे का केलं असावं? आपली प्रतिमा, त्याचं कुटुंब आणि मुलांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी हे केलंय. मला वाटतं ते बरोबर आहे... लोक त्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही.'

10/10

त्या पुढे असंही म्हणाल्यात की, 'माझं तिच्यावर प्रेम आहे का किंवा त्यांचं माझ्यावर प्रेम आहे का, हे लोकांना का जाणून घ्यायचं आहे? मी त्यांच्यावर प्रेम करते, ते माझ्यावर प्रेम करतात. इतकंच, कोणाला याबद्दल काय वाटतं याची मला पर्वा नाही.'