Anant-Radhika Pre-Wedding Bash: प्रेग्नेंट दीपिकाच्या एलिगेंट लूकची चर्चा, बॉलिवूडमधील कलाकारांची Vantara मध्ये मांदियाळी
Anant Ambani-Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग प्रोग्राममध्ये कलाकारांची खास उपस्थिती.
Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding Bash Photos: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची तीन दिवसीय सुपर ग्रँड प्री-वेडिंग बॅश जामनगरमध्ये सुरू आहे. प्री-वेडिंग बॅशच्या दुसऱ्या दिवशीही स्टार्सनी चांगला वेळ घालवला. बॉलिवूड-हॉलीवूड स्टार्ससोबतच जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती सध्या जामनगरमध्ये आहेत. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ सतत व्हायरल होत आहेत. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग बॅशच्या दुसऱ्या दिवसापासूनचे सेलेब्सचे लुक्सही समोर आले आहेत.