याला बोलतात मजबूत आहेर! अनंत अंबानी - राधिकाला मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर, आलिशान घर अन्…

Anant-Radhika Wedding Gifts : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकट्या मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांचा विवाह सोहळ्या अगदी भव्यदिव्य सुरुवात झाला. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर मंडळी आली होती. बॉलिवूड कलाकारांसाठी जणू हे घरच लग्न होतं. लग्न म्हटलं की आहेर आलाच. तर या वऱ्हाड्यांनी वर-वधूला काय गिफ्ट दिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. 

नेहा चौधरी | Jul 23, 2024, 10:09 AM IST
1/15

अनंत आणि राधिका यांना लग्नात आलिशान बंगला, आलिशान कार, अपार्टमेंट, हेलिकॉप्टरपासून जेटपर्यंत अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. ज्यांची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. 

2/15

रिपोर्टनुसार नीता आणि मुकेश अंबानी यांनी नवविवाहित जोडप्याला पाम जुमेराहमध्ये 3000 चौरस फुटांचं 640 कोटींच आलिशान घर गिफ्ट केलंय. त्यात 10 बेडरूम आणि एक खाजगी बीच आहे. त्यांनी अनंतला 5.42 कोटी रुपयांची बेंटले कॉन्टिनेंटल जीटीसी स्पीड कार आणि राधिकाला 130 कोटींचे दागिनेही दिले आहेत. 

3/15

ॲमेझॉनचे माजी सीईओ जेफ बेझोस यांनी या जोडप्याला 11.50 कोटींची बुगाटी कार गिफ्ट केलीय. 

4/15

अमेरिकेचा रेसलर जॉन सीनाने अनंत-राधिकाला त्यांच्या लग्नसोहळ्यात 3 कोटी लॅम्बोर्गिनी कार आहेर म्हणून दिली आहे. 

5/15

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या जोडप्याला 300 कोटीचं जेट दिलंय. 

6/15

सुंदर पिचाईनेही 100 कोटींचे हेलिकॉप्टर गिफ्ट दिलंय 

7/15

बिल गेट्सने या जोडप्याला 9 कोटींची हिऱ्याची अंगठी भेट दिली. तर दुसऱ्या वापरकर्त्याने X वर दावा केला की त्यांनी 180 कोटींची आलिशान नौका भेट दिली.

8/15

बॉलिवूड वृत्तानुसार कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 19 लाखांची सोन्याची चेन आहेरमध्ये दिलीय.

9/15

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी यांनी अंबानी दाम्पत्याला 25 लाखांची हस्तनिर्मित शाल गिफ्ट केलीय. 

10/15

अक्षय कुमारने अनंत आणि राधिका यांना 60 लाखांचा सोन्याचा पेन दिलाय.

11/15

SRK आणि गौरी खान यांनी अनंत आणि राधिकाला फ्रान्समध्ये 40 कोटींचे आलिशान अपार्टमेंट गिफ्टमध्ये दिलंय. 

12/15

अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अंबानी दाम्पत्याला 30 कोटींचा नेकपीस भेट म्हणून दिलाय.

13/15

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी अनंत आणि राधिकाला 9 कोटींची मर्सिडीज गिफ्ट केलीय.

14/15

सलमान खानने या जोडप्याला 15 कोटीची स्पोर्ट्स बाईक आहेरात दिलीय. 

15/15

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी 20 कोटीचा रोल्स रॉयस कार गिफ्ट दिलीय. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x