देशासाठी आईचा त्याग, 19 महिन्यांच्या मुलीला घरी ठेऊन दीपिका पोहोचली पॅरिसला

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला आता काही दिवसांचाच अवधी राहिला असून भारतीय पथक सज्ज झालं आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून जास्तीत जास्त पदकांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

| Jul 22, 2024, 20:54 PM IST
1/8

देशासाठी आईचा त्याग, 19 महिन्यांच्या मुलीला घरी ठेऊन दीपिका पोहोचली पॅरिसला

2/8

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेला पुढच्या आठवड्यापासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील विविध खेळातील हजारो खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी (Paris Olympic) भारताचं  (India) 117 खेळाडूंचं पथक पाठवण्यात आलं आहे. 

3/8

भारतीय पथकात दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधु (PV Shindhu) आणि 2020 टोकिया ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) समावेश आहे. भारतीय पथकात सर्वाधिक खेळाडू अॅथलेटिक्समध्ये आहे. अॅथलेटिक्ससाठी एकूण 29 खेळाडू असून यात 11 महिला आणि 18 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. 

4/8

भारताची आघाडीची तिरंदाजपटू दीपिका कुमारी पदक मिळवण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्याचं स्वप्न दीपिका कुमारीने बाळगलं आहे. पण यासाठी दीपिकाने मोठा त्याग केला आहे.  दीपिका आपल्या 19 महिन्यांच्या मुलीला घरी ठेऊन पॅरिसमध्ये दाखल झाली आहे. 

5/8

दीपिका कुमार चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. आतापर्यंत तिला पदकाने हुलकावणी दिली आहे. पण यंदा तीने पदकाचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. यासाठी तीने दिवसरात्र सराव केलाय. आपल्या मुलीपासून दूर राहण्याचा दु:ख वेगळं असतं, पण देशासाठी हा त्याग करायला आपण तयार असल्याचं दीपिकाने म्हटलंय.

6/8

30 वर्षांच्या दीपिकाने तिरंगाजी वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 4 वेळी वैयक्तिक आणि 7 वेळा सांघिक सुवर्णपदक जिंकलं आहे. 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीपिकाच्या नावावर 2 सुवर्णपदकं जमा आहेत. 

7/8

टोकिया ऑलिम्पिकमध्ये 119 खेळाडूंनी भाग घेतला. यावेळी भारताने सात पदकं जिंकली होती. यावेळी जास्त पदकांची अपेक्षा आहे. 25 जुलैपासून भारताच्या मिशन ऑलिम्पिकला सुरुवात होईल. तिरंदाजीत महिला वैयक्तिक रँकिंग राउंड (दुपारी 1 वाजता) आणि पुरुष वैयक्तिक रँकिंग राउंड खेळवला जाणार आहे.

8/8

ऑलिम्पिक इतिहासात भारताने आतापर्यंत 35 पदकांची कमाई केली आहे. यात 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वाधिक पदकांची कमाई केली होती. यंदा भारतीय खेळाडूंच्या पथकात महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा समावेश आहे.