दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत बाईकवर अनन्याची स्टंटबाजी

नव्या चर्चांना उधाण

Mar 01, 2020, 19:36 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडासोबत अनन्या भूमिका साकारणार आहे. सध्या चित्रपटाची शूटींग चांगलीच जोरात सुरू आहे. चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे विजय आणि अनन्या चर्चेत आले आहे. 

1/7

चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून वियज बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

2/7

या चित्रपटामध्ये विजय आणि अनन्या मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. शिवाय हे दोन कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. 

3/7

चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या खांद्यावर आहे.

4/7

सध्या बाईकवर विजयसोबत स्टंट करताना अनन्याचा हॉट लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. 

5/7

चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अनन्या आपल्या कामाचा आनंद घेताना दिसत आहे.

6/7

याआधी आनन्या अभिनेता कार्तिक आर्यनसोबत 'पती पत्नी और वो' चित्रपटामध्ये झळकली होती. विवाहबाह्य संबंधांवर अधारलेल्या चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली होती. 

7/7

‘स्टूडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातील अभिनयासाठी तिला ‘फिल्मफेअर’ देण्यात आला. यावरुन तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली. अनेकांनी तर ‘फिल्मफेअर’ या पुरस्कारावरच बहिष्कार टाकला होता.