अंकिताचा ब्लॅक स्कर्ट आणि व्हाइट टॉपमधील ग्लॅमरस अंदाज

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) या दिवसात एका वेगळ्या अंदाजामध्ये दिसत आहेत.

Apr 18, 2021, 16:16 PM IST

मुंबई : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) या दिवसात एका वेगळ्या अंदाजामध्ये दिसत आहेत. अंकिता सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. आयुष्यातील नवीन क्षणांचे फोटो ती शेअर करते. आता पुन्हा एकदा अंकिताने नवीन फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटेल.

1/6

अंकिताचा ग्लॅमरस अंदाज

अंकिताचा ग्लॅमरस अंदाज

अंकिताने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बरीच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये अंकिताने ब्लॅक स्कर्ट आणि व्हाइट टॉप घातला आहे. ट्रान्सपरेंट फॅब्रिक टॉप तिच्यावर चांगला दिसत आहे.

2/6

चाहत्यांना दिले सरप्राइज

चाहत्यांना दिले सरप्राइज

अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande)तिच्या चाहत्यांशी कनेंक्ट राहण्याची कोणतीही संधी सोडत नाही. यावेळी तिने आपल्या नवीन लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

3/6

अंकिताचा साडीमधील हटके लुक

अंकिताचा साडीमधील हटके लुक

अंकिताने अलीकडेच ट्यूब स्टाईल ब्लाउज आणि साडीमध्येही अतिशय बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

4/6

अंकिताने दिले हे कॅप्शन

अंकिताने दिले हे कॅप्शन

अंकिताने या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'मी तुला पाहू शकते' असे लिहिले आहे.

5/6

या ड्रेसमध्ये केला कहर

या ड्रेसमध्ये केला कहर

यापूर्वी अंकिताने पांढऱ्या गाऊनमधले फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये ती एका हॉलिवूड स्टारसारखी दिसत आहे. अंकिताची ही ग्लॅमरस अदा पाहून चाहते तिचे कौतुक करीत आहेत. पण तिच्या साधेपणावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी तिच्या बदलेल्या लुकबदल तक्रार केली आहे.

6/6

हेअर स्टाईलने जिंकले मन

हेअर स्टाईलने जिंकले मन

या फोटोमध्ये सर्वात आर्कषक तिची नवीन हेअरस्टाईल आहे. अंकिता  कुरळ्या लहान केसांमध्ये फार वेगळी दिसत आहे.