Anti Valentine Week List 2024: 'या' तारखेपासून सुरु होणार अँटी व्हॅलेंटाईन वीक! ब्रेकअप डे, स्लॅप डेसह हे अनोखे दिवस

Anti Valentine Week List 2024 : व्हॅलेंटाइन डेनंतर सुरु होतो तो अँटी व्हॅलेंटाईन वीक. ज्यामध्ये कपल्स ब्रेकअप डे, स्लॅप डेसारखे अनोखे डेज साजरे करतात. 

Feb 14, 2024, 17:46 PM IST
1/7

व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीपासून  21 फेब्रुवारीपर्यंत अँटी व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. यामध्ये पहिला दिवस साजरा केला जातो तो म्हणजे स्लॅप डे. यामध्ये दोन लोकांमध्ये जेव्हा मतभेद होतात तेव्हा त्यांचा राग या दिवशी व्यक्त केला जातो. पण याचा अर्थ त्याला कानाखाली मारावं असं नाही. 

2/7

अँटी व्हॅलेंटाईन वीक दुसरा दिवस हा किक डे म्हणून साजरा करण्यात येतो. याचा अर्थ तुमचं तुमच्या जोडीदाराशी पटत नाही आणि त्याला सोडायचं असेल तर यादिवशी त्याला आपल्या आयुष्यातून काढलं जातं. म्हणजे किक मारली जाते. 

3/7

स्लॅप डे आणि किक डे नंतर तिसरा दिवस असतो परफ्यूम डे. या दिवशी तुमच्या नात्याला आणखी एक संधी देण्यासाठी तुमच्या जोडीदाराला परफ्यूम देऊ नवीन सुरुवात केली जाते. 

4/7

मग 18 फेब्रुवारीला येतो फ्लर्टिंग डे. यादिवशी व्हॅलेंटाइनचा उत्साह अजून सुरु राहावा आणि नात्यात प्रेम वाढावं म्हणून हा डे साजरा करण्यात येतो. 

5/7

कन्फेशन डे हा 19 फेब्रुवारी असणार आहे. यादिवशी आपल्या जोडीदाराजवळ आपल्या चुकीची कबूली दिली जाते. तुम्ही काही नात्यात चूक केली असेल तर माफी मागून यादिवसापासून नवीन सुरुवात करा. शिवाय तुमच्या मनातील कुठल्याही गोष्टीचा खुलासा तुम्ही या दिवशी करु शकता. 

6/7

20 फेब्रुवारीला येतो तो मिसिंग डे. जर तुम्ही कोणाला मिस करत असाल तर यादिवशी त्या व्यक्तीला तुम्ही नक्की सांगा, तुम्ही त्या व्यक्ती आयुष्यात किती मीस करत आहात. 

7/7

व्हॅलेंटाइन वीक आणि त्यानंतर अँटी व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस ब्रेकअप डे. हा दिवस ब्रेकअप करण्यासाठी नाहीतर जे लोक सिंगल असतात ते व्हॅलेंटाइनला विरोध म्हणून हा दिवस साजरा करतात. त्यासोबत तुम्ही चुकीच्या नात्यातून बाहेर येण्यासाठी ही एक संधी असते.