PHOTO : महेश भट्टला शाप, पहिल्या चित्रपटासाठी संघर्ष; 500 हून अधिक चित्रपट करणाऱ्या अभिनेत्याने रेल्वे स्टेशनवर काढली रात्र

Entertainment : मोहब्बत का नाम आज भी मोहब्बत है, यह न कभी बदली है और न कभी बदलेगी... हा प्रसिद्ध डायलॉग तुम्हाला आठवतो का? या फोटोमध्ये कोपऱ्यात हसणारा चिमुकला आज नावाजलेला अभिनेता आहे. 

Mar 07, 2024, 09:18 AM IST
1/8

पहिल्या चित्रपटासाठी संघर्ष करावा लागणाऱ्या या अभिनेत्याने 500 हून अधिक चित्रपटात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात घर केलंय. 

2/8

आम्ही बोलत आहोत चार दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत सक्रिय असणाऱ्या अनुपम खरे यांच्याबद्दल. 7 मार्च 1955 ला शिमलामध्ये अभिनेत्याचा जन्म झाला. अनुपम खेर हे काश्मिरी पंडित असून त्यांचे वडील पुष्कर नाथ खेर हे हिमाचल प्रदेशातील वन विभागात लिपिक आणि आई दुलारी खेर गृहिणी. 

3/8

दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं. राज बिसारिया यांच्या भरतेंदू नाट्य अकादमी, लखनौमधून नाटक शिकल्यानंतर त्यांचा संघर्ष सुरु झाला तो मुंबईत आल्यानंतर. 

4/8

संघर्ष काळात त्यांना मुंबईत अनेक लहानमोठ्या नोकऱ्या कराव्या लागल्या. एवढंच नाही तर कधी समुद्र किनाऱ्यावर तर कधी रेल्वे स्टेशनवर त्यांनी रात्र काढली. 

5/8

त्यानंतर त्यांना सारांश चित्रपटात पहिली संधी मिळाली खरं पण तरुण वयात त्यांना 60 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारावी लागली. पण या भूमिकेने त्यांना ओळख मिळवून दिली आणि त्यांचं नशीब चमकलं.

6/8

सारांश चित्रपटाचा एक किस्साही त्यांनी सांगितला आहे, ज्यावेळी ती वृद्ध व्यक्तीच्या भूमिकेची तयारी करत होते तेव्हा महेश भट्ट अचानक आले आणि त्यांनी मला चित्रपटातून काढून टाकलं. एवढंच नाही तर माझ्या ऐवजी संजीव कुमारला घेतलं. याचा अनुपम यांना राग आला होता आणि ते मुंबईत सोडून जाणार होते. 

7/8

रागाच्या भरात ते महेश भट्टच्या घरी पोहोचले आणि म्हणाले की, तू सत्य घटनेवर चित्रपट बनवत आहेस, पण तुझ्या आयुष्यात सत्य नाही. मी ब्राह्मण आहे, मी तुला शाप देतो. हे ऐकून महेश भट्ट आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी अनुपम यांना थांबवले. त्यानंतर हा चित्रपट हिट झाला. 

8/8

अनुपम खेर यांनी 1979 मध्ये मधुमती कपूरसोबत लग्न केले. पण काही महिन्यांमध्येच ते विभक्त झाले. त्यानंतर1985 मध्ये किरण खेर त्यांच्या आयुष्यात आल्या. लग्नाच्या वेळी किरण खेर यांनी पहिल्या पतीपासून झालेल्या मुलगा सिकंदरला आणलं होतं. अनुपम यांनी सिकंदरला दत्तक घेतलं.