Arjun Tendulkar IPL Debut : डेब्यू सामन्यात अर्जुन तेंडुलकरने रचला इतिहास!

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 22 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) यांच्यात वानखेडेवर होत आहे. या सामन्यातून अर्जुन तेंडूलकरने आयपीएल (Arjun Tendulkar IPL Debut) पदार्पण केले.

Apr 16, 2023, 17:49 PM IST

Arjun Tendulkar: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 22 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) यांच्यात वानखेडेवर होत आहे. या सामन्यातून अर्जुन तेंडूलकरने आयपीएल (Arjun Tendulkar IPL Debut) पदार्पण केले.

1/5

सर्वांनाच ज्याची प्रतिक्षा होती, तो क्षण आला. मास्टर ब्लास्ट सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएल डेब्यू केला आहे.

2/5

मागील 2 वर्षे बेंचवर बसून राहिल्यानंतर अर्जुन तेंडुलकर याला आता आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. अर्जुन तेंडुलकर 2021 पासून मुंबई इंडियन्स संघासोबत जोडला गेला आहे.

3/5

अर्जुन तेंडुलकरने डेब्यू करताच इतिहास रचला. टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक इरफान पठाण (Irfan Pathan) याने ट्विट करत याची माहिती दिली आहे.

4/5

आयपीएल इतिहासात एक बाप - मुलाच्या जोडी एकाच फ्रेंचायजीकडून  (Mumbai Indians) खेळण्याची ही पहिलीच घटना ठरली.

5/5

दहा वर्षाच्या अंतरात वडील आणि मुलगा एकाच फ्रेंचायजीकडून खेळले. ही आयपीएलमधील ऐतिहासिक घटना ठरली. अर्जुन तेंडुलकर तुला खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत इरफानने अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत.