50 दिवसांनंतर लेक घरी आला! भावूक होऊन केजरीवालांची आईला मिठी, वडिलांच्या पायाशी वाकले CM
सुप्रीम कोर्टाने दिल्लचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिली आहे. 50 दिवसांनंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदा घरी गेले आहे.
50 दिवसांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने आंतरिम जामीन मंजूर केला आहे. 2 जून रोजी केजरीवाल यांना सरेंडर करावं लागणार आहे. या काळात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अनेक अटींसह जामीन मंजूर केला आहे. निवडणूक प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत, मात्र मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्ली सचिवालयात जाण्यास बंदी यांसारख्या काही अटी घातल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात अनेक अटींसह केजरीवाल यांना जामीन देण्याचे आदेश दिले. केजरीवाल यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे. निवडणूक प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर कोणतेही बंधन घातलेले नाही.