Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठलभेटीचा उत्साह शिगेला...; रिंगण सोहळ्यातील भारावणारी दृश्य; पाहून लगेच स्टेटसला ठेवाल

Ashadhi Ekadashi 2024 : पंढरपुरातील वातावरण सध्या एका वेगळ्याच शिखरावर पोहोचलं आहे कारण, इथं कणाकणात विठ्ठल आहे... 

Jul 16, 2024, 14:50 PM IST

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीच्या निमित्तानं साधारण जून महिन्यापासूनच शेतशिवाराची कामं उरकून गावखेड्यातून अनेक पाय पंढरीच्या दिशेनं वळले. 

1/7

विठ्ठल भेटीची ओढ

Ashadhi Ekadashi 2024 best photos status ringan drone shots

Ashadhi Ekadashi 2024 : पावसाचे ढग आले, मिरगाची सुरुवात झाली की अनेकांनाच विठ्ठल भेटीची ओढ लागते. शेतीची कामं उरकून, प्रपंचातून काहीसा वेळ काढून अनेकांचीच पावलं चंद्रभागेतीरी असणाऱ्या पंढरीकडे वळतात. 

2/7

वैष्णवांचा महामेळा

Ashadhi Ekadashi 2024 best photos status ringan drone shots

कटेवर हात ठेवून विटेवर उभ्या असणाऱ्या या पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची आस मनात ठेवून प्रत्येतजण या वारीचा वारकरी होतो आणि नकळत एक- एक जण जोडला जाऊन वैष्णवांचा महामेळा पंढरपूरच्या दिशेनं निघतो. 

3/7

मैलांचा प्रवास

Ashadhi Ekadashi 2024 best photos status ringan drone shots

असा हा अनेक मैलांचा प्रवास प्रतिवर्षी पार करणाचं सत्र यंदाही पाहायला मिळालं. संत- महात्म्यांच्या पालख्या आणि त्यांच्यासोबतीनं निघालेल्या दिंड्या आता पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. तर, काही मंडळी शहरांतून थेट पंढरपूर गाठत आहेत. 

4/7

महत्त्वाचे टप्पे

Ashadhi Ekadashi 2024 best photos status ringan drone shots

वारीच्या या प्रवासामध्ये महत्त्वाचे टप्पे असतात ते म्हणजे रिंगणारे. गोल रिंगणापासून उभ्या रिंगणापर्यंत आणि अगदी मेंढ्यांच्या रिंगणापर्यंत प्रत्येक रिंगणाचा अनुभव हा तितकाच खास असतो. 

5/7

रिंगण

Ashadhi Ekadashi 2024 best photos status ringan drone shots

यंदाच्या वारीतही रिंगण सोहळ्यांदरम्यान वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याटं पाहायला मिळालं. वारीदरम्यान वारकऱ्यांनी सुरेख संचलन सादर करत टाळ- मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाला आळवलं आणि सारी सृष्टी तरारली. 

6/7

वारकऱ्यांचा उत्साह

Ashadhi Ekadashi 2024 best photos status ringan drone shots

पावसाची मधूनच येणारी सर या वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित करताना दिसली. कारण, त्यांच्या या वारीचं परमोच्च शिखर नजीक असल्याचीच ही जाणीव होती.   

7/7

आसमंत निनादून गेला

Ashadhi Ekadashi 2024 best photos status ringan drone shots

पंढरपूराच्या वेशीवर पोहोचल्यानंतर विठ्ठलाच्या जयघोषानं सारा आसमंत निनादून गेला आणि रिंगण सोहळा पाहणारा प्रत्येकजण भारावून गेला. रिंगण सोहळ्याची ही काही कमाल क्षणचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, ती इतकी सुरेख आहे की लगेचच स्टेटसवर ठेवाल किंवा शेअर कराल...